यवतमाळ राजकीय

महिलांना सक्षम करण्यास शिवसेनेचे एक पाऊल पुढे

जिल्हा प्रतिनिधी

महिलांना सक्षम करण्यास शिवसेनेचे एक पाऊल पुढे

शिवसेनेचे ध्येय, धोरण, महिलांसाठी विविध योजना सर्वसामान्य घरातील महिला पर्यंत पोहचले पाहिजे,घरा घरातील महिला सक्षम झाल्या पाहिजे या करीता शिवसेनेच्या वतीने एक पाऊल पुढे टाकत सागरताई पुरी यांनी सतत कार्य सुरू केले तसेच महिला संघटन वाढीसाठी दिग्रस येथील वर्षाताई निगोट व यवतमाळ येथील गंगाताई राठोड व ज्योतीताई चिखलकर यांच्या कार्याची दखल घेत. शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्ती पत्र देवुन जिल्हा महिला संपर्क संघटक शिल्पाताई देशमुख यांनी नुकतीच नियुक्ती केली. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख परागभाऊ पिंगळे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक सौ.सागरताई पुरी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख निर्मलाताई विनकरे, तालुका प्रमुख अंजलीताई गिरी, शहर प्रमुख कल्पनाताई दरवई गोलु भाऊ जोमद व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©