Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; एक कोरोनामुक्त

जिल्हा प्रतिनिधी

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; एक कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2158 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि. 24 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात एक व बाहेर जिल्ह्यात दोन अशी एकूण तीन आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 838 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 838 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72874 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71084 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 40 हजार 438 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 67 हजार 447 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.84 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2158 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 16 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2158 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 16 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 771 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

डेंग्यू आजार रोखण्यासाठी घरोघरी स्वच्छता आवश्यक

विशेष स्वच्छता अभियानाच्या सुरूवातीप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

 

नगर परिषद व जि.प. आरोग्य विभागातर्फे 2 ऑक्टोबर पर्यत संयुक्त स्वच्छता मोहिम

 

नागरिकांनी स्वच्छता मोहीम सहभागी व्हावे

 

यवतमाळ दि. 24 सप्टेंबर : जिल्ह्यात डेंग्यूचा आजार वाढू नये व नियंत्रणात राहावा यासाठी जिल्हा परिषद व नगर परिषद यांनी सर्व नागरिकांच्या सहभागाने संपुर्ण जिल्ह्यात 2 ऑक्टोबर पर्यंत घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, नागरिकांनी कोरडा दिवस पाळून घराच्या परिसरातील भंगार साहित्याची विल्हेवाट लावून पाणी साचणार नाही यासाठी उपायोजना करून डेंग्यु व मलेरीयाच्या वुत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आमोल येडगे यांनी आज केले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी दोन दिवसांपुर्वीच जिल्हा परिषद व नगर परिषद यांना संयुक्तरित्या मोहिम राबवून डेंग्यु आजाराचा नायनाट करण्याकरीता एका आढावा सभेत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने विशेष स्वच्छता अभियानाची सुरूवात आज यवतमाळ शहरातील जय-विजय चौक व संभाजी नगर परिसरातून करण्यात आली. याठिकाणी साफसफाई मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेवून जिल्हाधिकारी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी नगराध्यक्ष कांचन चौधरी, मुख्याधिकारी माधुरी मडावी तसेच आरोग्य सभापती साधना काळे, नगरसेवक सुजीत राय, संगीता राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विजय आकोलकर हे देखील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी यांनी डासाची उत्पत्तीची ठीकाणे नष्ट करणे, शौचालायाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जुने टायर, प्लॅस्टिक इ. मध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, आठवड्यातून एक दिवस सर्व पाण्याचे भांडे स्वच्छ धुवून किमान दोन तास उन्हात पुर्णपणे वाळवून कोरडा दिवस पाळणे आदि आवश्यक उपाययोजना करण्याचे सांगितले. सदर साफसफाई केवळ एक दिवसासाठी न करता किमान सात दिवस दररोज करावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी येडगे, नगराध्यक्षा चौधरी व इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या घरी भेटी देवून भांडी व टाक्यात साचलेले पाणी रिकामे केले. कचरा व नाल्यांची सफाई करण्यात आली. साचलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास तयार होत असल्याने जिल्हा परिषदेच्या हिवताप कार्यालयामार्फत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर टेमिफॉस टाकून निर्जंतुकीकरण करण्यात आले. नगर परिषदेद्वारे ध्वनीक्षेपाद्वारे स्वच्छतेविषयी साचलेले डबके तसेच कोरडा दिवस पाळणे याबाबत अभियान कालावधीत जनजागृती करण्यात येत आहे. नागरी परिसरात तसेच ग्रामीण भागात जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियमितपणे स्वच्छता मोहिमेला भेटी देणार आहेत.

यावेळी नगर परिषदेतील डॉ. विजय अग्रवाल, तालुका आरोग्य अधिकारी क्रांतीकुमार मावडीकर, डॉ. तनवीर शेख, प्रशांत पाटील, टि.व्ही.कुळकर्णी, धिरज पिसे, रवि रामेकर, सुनिल वंजारी, मुन्ना शुक्ला, मोहन दहेकर, संतोष गजभिये व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_______________________________________

 

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस संपन्न

यवतमाळ दि. 24 सप्टेंबर : वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ येथे आज राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. दि. 24 सप्टेंबर 1969 या दिवसी राष्ट्रीय सेवा योजना स्थापन करण्यात आली होती. त्यानिमित्ताने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महाविद्यालयाच्या परिसरात महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवनकार्याची माहिती देवून अहिंसा व स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. देशातील प्रत्येक नागरिकांनी राष्ट्राप्रती कर्तव्याची भावना ठेवून एक सुजाण नागरिक व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. राष्ट्रीय सेवा म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी स्वयंस्फुर्तपणे स्वच्छता करून देश सेवा केली. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून स्वयंस्फुर्तपणे राष्ट्रसेवा करण्याची भावना प्रत्येकामध्ये असणे अतिशय आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पार्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. अंजली गहरवार, डॉ. रविंद्र सातभाई, डॉ. प्रशांत शिंगोटे, डॉ. संदेश बांगर, प्रा. हेमंत वाघ, डॉ. रोशन शिंदे, डॉ. प्रशांत काळे, डॉ. प्रतिक पुसदकर, डॉ. पि. के. प्रधान, एकनाथ भंकाळे व भारती मेश्राम उपस्थित होते.

Copyright ©