यवतमाळ सामाजिक

बळीराम पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवस साजरा

किनवट प्रतिनिधी

बळीराम पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवस साजरा

किनवट बळीराम पाटील महाविद्यालयात 24 सप्टेबर रोजी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने झूम मिंटिंग द्वारे राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक प्रा. मारुती गुंडाळे हे होते. यांनी “राष्ट्रीय सेवा योजना व युवकांची भूमिका” या विषयावर रासेयो स्वयंसेवकांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात युवक हा देशाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. देशात कोणताही बदल हा युवकच करू शकतो. खेड्याचा विकास करण्यास युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव यांनी केले आहे. प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.शेषराव माने प्रा. डॉ. पी. एल .शेरे डॉ पी.डी.घोडवाडीकर डॉ.
प्रा.डाँ. लता पेंडलवाड प्रा.डी.टी.चाटे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक किशोर आडे, करण वर्मा, मनोज कुरमे, आतिश तामगाडगे, ऋतुजा जाधव ,शुभम मांजरमकर ,साक्षी आडे, कु.रचना इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी क.म.प्रा. पी.एम. यरडलावार यांनी मानले.

Copyright ©