यवतमाळ सामाजिक

शब्दशिल्प साहित्य संघ देणार “कलिम काव्यरत्न पुरस्कार”

आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम

शब्दशिल्प साहित्य संघ देणार “कलिम काव्यरत्न पुरस्कार”

महाराष्ट्रातील मराठी, हिंदी, उर्दू साहित्य क्षेत्रात आपला अनमोल ठसा उमटवून साहित्य क्षेत्राला अचानक पोरके करून निघुन जाने खर तर साहित्त्यीकांना न पटणारे झाले. ते कोणताही साहित्यिक मान्यही करनार नाही. कलीम खान हे साहित्य रूपाने सदा वास्तव्य करीत आहेत. ते म्हणजे कधी कलीमच्या कवितेच्या रूपात तर कधी गज़ल कौमोदी च्या रूपात. शब्दरत्नाकराच्या भांडारात तर कधी कलीम के दोहे च्या अथांग ज्ञान सागरात साहित्य प्रेमींना सैर सफाटा करीत. म्हनुन साहित्य क्षेत्रातील कलीम खान यांची मौल्यवान रत्ने प्रेमींच्या सदा आठवणी जागृत ठेवन्यास अक्षरशा भाग पाडतात. म्हणुनच काय तर आर्णी शब्दशिल्प साहित्य संघ यांनी कलीम खान यांच्या आठवणी कायम स्मरणात रहाव्यात यासाठी शहरातील भुषण म्हणून कलीम काव्यरत्न पुरस्काराचे आयोजन केलेले आहे.
या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ मानचिन्ह, व रोख रक्कम सुद्धा रहाणार असुन त्यासाठी साहित्य क्षेत्रातील आवड असलेल्या व्यक्तीने आपले गज़ल,काव्य साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य करनार्‍या आपल्या सिद्धहस्त लेखनीने जगाला वेडं लावणार्‍या भारतभर व्यापलेल्या
काव्य,गजल,मुक्तछंद,रूबाई च्या साहित्यिकांना भाग घेता येईल.
प्रथमच देण्यात येत असलेल्या या साहित्य पुरस्काराकरीता आपण लिहिलेले साहित्य शिल्प १० सप्टेंबर २०२१ ते तर ३१ डिसेंबर २०२१ या तारखे पर्यंत पाठवू शकता. त्यासाठी पत्ता आहे.शब्दशिल्प साहित्य प्रतिष्टाण.विजय शंकर ढाले
मु.पो.आर्णी (बहिरम नगर)
ता.आर्णी जि.यवतमाळ ४४५ १०३ आपल्या साहित्यशिल्पाच्या दोन प्रति व्यवस्थित व सुरक्षित पोहचेल अशा पॅकींग मध्ये पाठवा.असे आव्हान करण्यात आले आहे.

Copyright ©