यवतमाळ सामाजिक

तलाठी मृत्यू प्रकरणी प्रशासनाची बघ्याची भूमिका,पटवारी यांचे आंदोलन होतय तिव्र

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

तलाठी मृत्यू प्रकरणी प्रशासनाची बघ्याची भूमिका,पटवारी यांचे आंदोलन होतय तिव्र
———————————————
DSC जमा केल्याने शेतक-यांना नाही मिळनार ७/१२
———————————————
घाटंजी-आर्णी तालुक्यातील तलाठी यांचा ई-पीक पाहणी दरम्यान मृत्यू झाला तो वरीष्ठांच्या चुकीच्या अंमलबजावणी व दबावामुळे झाल्याचा आरोप विदर्भ पटवारी संघा मार्फत करण्यात आला असून संबंधितांवर कारवाई व्हावी व तलाठी पस्तापूरे यांच्या कुटूंबीयांना न्याय मिळावा याकरीता जिल्ह्यातील तलाठी यांचेकडून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

शासनाकडून राबविण्यात येणारे उपक्रम हे शासन निर्णय किंवा परीपत्रक यांचा कुठलाही विचार न करता स्थानिक पातळीवर तलाठी यांच्याकडून राबविण्यात येतात पण तो उपक्रम राबविण्यात येत असतांना तलाठी यांचेकडून नजरचुकीने जर काही चूक झाली तर प्रशासनाकडून लगेच संबंधित तलाठी यांचेवर कारवाई करण्यात येते परंतू जिल्ह्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचननंना डावलून ई-पीक पाहणी करण्यासाठी तलाठी यांचेवर दबावतंत्राचा वापर करून यांना सुटीच्या दिवशीही काम करण्यासाठी वरीष्ठांकडून प्रवृत्त करण्यात आले व त्यातच तलाठी पस्तापुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर‌ ओढावला असताना प्रशासनास मागणी करूनही प्रशासन गप्पच का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात ई-पीक पाहणीची चुकीची अंमलबजावणी करण्यात आली हे स्पष्ट दिसून येत असतांना देखिल अजूनही नियमीत महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचेकडून नियमित तलाठी यांनी‌ ई-पीक पाहणीचे‌ काम‌करण्याबाबत नियमीत आदेशीत केया जात आहे‌ यामुळे जिल्ह्यातील घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर देखिल प्रशासन किती गंभीर आहे हे स्पष्ट दिसून येत आहे व त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील तलाठी संवर्गाच्या भावना आनखी‌ तिव्र होत आहेत.
आंदोलनाचा भाग म्हणून तलाठी यांनी DSC तहसीलदार यांचेकडे जमा केल्याने शेतकरी यांना आंदोलन काळात तलाठी यांचेकडून संगणकीय प्रणाली मधिल उतारे मिळणे बंद झाले आहे प्रशासनाकडून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन यापुढेही कायमच राहनार आहे.

*”_प्रशासन घडलेल्या घटनेनंतरही जिल्ह्यातील तलाठी यांचेवर दबाव निर्माण करीत असल्यास आंदोलनाची तिव्रता वाढविण्यात येईल व त्यास प्रशासन जबाबदार राहील”_*

*बाळकृष्ण गाढवे*
केंद्रीय अध्यक्ष,विदर्भ पटवारी संघ नागपूर

 

“_जिल्ह्यात ई-पीकच्या चुकीच्या अंमलबजावणी मुळे तलाठी यांचा मृत्यू झाल्यानंतरही वरीष्ठाकडून नियमीत तलाठी यांनाच ई-पीक पाहणी करीता आदेशीत केल्या जात आहे_”

कामराज चौधरी
जिल्हाध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ, यवतमाळ

Copyright ©