यवतमाळ राजकीय

जुबेर पटेल यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या अंबड तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी

जुबेर पटेल यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या अंबड तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती.

राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या अंबड तालुकाध्यक्ष पदी जुबेर पटेल यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमंत मामा राऊत जिल्हाध्यक्ष (प्रहार जनशक्ती पक्ष जालना)
यांच्या हस्ते जुबेर पटेल यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

जुबेर पटेल यांनी चार वर्षे निस्वार्थपणे प्रहार जनशक्ती पक्षाचे काम केले आहे.
जुबेर पटेल हे उच्चशिक्षित नवतरुण असल्याने प्रहार सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी शिवाजी बप्पा सवणे (प्रहार कार्याध्यक्ष जालना), मोहन मुंडे साहेब (प्रहार जिल्हा समन्वयक जालना), संदीप धुळे सर (प्रहार जिल्हा सचिव जालना), बाळासाहेब पाटील काळवणे (युवा जिल्हाध्यक्ष जालना), महादेव थुटे तालुकाध्यक्ष घनसावंगी, आकाश थेटे पाटील (युवा तालुकाध्यक्ष अंबड), गोपाळ मुळे (युवा तालुका उपाध्यक्ष), राम ठाकूर (प्रहार कार्याध्यक्ष अंबड), माऊली हुसे रोहिलागड सर्कल प्रमुख, प्रदिप शिंदे प्रहार सेवक आदींनी जुबेर पटेल यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वंदनीय बच्चू भाऊ कडू यांचे विचार कार्य सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून समाज कार्य करणार असल्याचे यावेळी जुबेर पटेल यांनी सांगितले. गावाखेड्यापर्यंत मा. नामदार बच्चू भाऊ कडू यांचे नाव पक्षाची पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही असे कोणतेही क्रुत्य करणार नसल्याचे जुबेर पटेल यांनी सांगितले.

Copyright ©