यवतमाळ सामाजिक

घाटंजी तालुक्यातील नेत्र रुग्नांचे हाल

कार्यकारी संपादक राजु चव्हाण

घाटंजी तालुक्यातील नेत्र रुग्नांचे हाल
————————————————
घाटंजी- ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले नेत्र चिकित्सा अधिकारी, डॉ विलास मुन,यांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे त्यांना तड़काफड़की येथून कार्यमुक्त करन्यात आले. त्यामुळे मागील एक महिन्यापासुन येथील नेत्र रुग्णाना मिळणारी मोफत नेत्र तपासणी सुविधा ,मोतिबिंदु शिबिरे अचानक बंद झाली.आणी गरीब नेत्र रुग्नांचे हाल सुरु झाले.
या ठिकाणी कार्यरत डॉ मून यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाली मात्र त्यांना कार्यमुक्त करतांना येथे पर्यायी व्यवस्था किंवा दूसरे कोणीतरी नेत्र चिकित्सा अधिकारी येईपर्यंत येथील कार्यरत अधिकारी यांना कार्यमुक्त करायला नको होते. कारण घाटंजी तालुका हा आदिवासी बहुल असून तेलंगाना सिमेपर्यंत पसरलेला आहे,त्यामुळे अचानक नेत्र तपासणी सुविधा बंद झाल्यामुळे गरीब रुग्नांचे हाल होत आहे.
तरी प्रशासनाने लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालयात नेत्र चिकित्सा अधिकारी उपलब्ध करून देवून गरीब रुग्णांची होणारी गैरसोय लवकरात लवकर दूर करावी अशी मागणी घाटंजी तालुक्यातील नेत्र रुग्ण करीत आहे.

Copyright ©