Breaking News यवतमाळ सामाजिक

राजकीय सूडबुद्धीने जोडमोहा येथिल वयोवृध्द आदिवासी महिलेस जीवनातून उठविण्याचा कटकारस्थान

राजकीय सूडबुद्धीने जोडमोहा येथिल वयोवृध्द आदिवासी महिलेस जीवनातून उठविण्याचा कटकारस्थान
——————————————–
सरपंचाचे कुटील राजकारण ठरतेय विधवा वृध्द महिलेस मनस्ताप
——————————————–
यवतमाळ- ग्राम पंचायतिचे राजकारण कधी कोणते वळण घेतील याचा नेम नसतो. असाच प्रकार कळंब तालुक्यातील जोडमोहा ग्राम पंचायतीच्या सरपंचाच्या कुटील राजकारणाने वळण घेत चक्क सन १९७० पासून वास्तव्यास राहणाऱ्या विधवा आदिवासी वयोवृध्द महिला पार्वता चंद्रभान मराठे ग्राम पंचायतीची अतिक्रमित जागा असल्याचे सांगून तिचे राहते घरच उचलण्याचे नोटिसद्वारे ताकीत दिली आहे.
जोडमोहा येथिल आदिवासी महिला पार्वता मराठे हिने सन १९७० मध्ये वॉर्ड क्रमांक १ मध्ये आपले घर बांधले. त्यावेळेला या वॉर्डांत दुसरे एकही घर नव्हते. त्यानंतर त्या जागेचा व घराचा रितसर ग्राम पंचायतीचे कराची आकारणी येवू लागली ते तिने या करासोबत पाणी कर सुध्दा नियमित भरणा करीत आहेत. शासनाच्या नविन परिपत्रकानुसार जागेचा पट्टा द्या असे असले तरी आज ७० वर्षाचा कालावधी लोटल्यावर राजकीय सूडबुद्धीने विद्यमान सरपंच यांनी येथे बाकी अतिक्रमित धारकांना कोणतीही नोटीस न देता केवळ मराठे यांनाच नोटीस देवून घराची उचल करण्याचे बजावित घराची उचल न केल्यास कारवाई करण्याबाबत दम भरला असल्याने ही वयोवृध्द आदिवासी महिला पुर्णतः भयभित झाली आहे. त्यामुळे तिने आपणास न्याय द्यावा राजकीय सूडबुद्धीने माझ्या राहत्या घरावर अतिक्रमण चे कारण पुढे करून मनमानी कारभार वापरून बळजबरी करू नये असे निवेदन दिले आहे. वॉर्ड क्रमांक १ मध्ये माझ्या मागून वास्त्यव्यास आलेल्यांना एकही नोटीस नाही आणि मलाच हा त्रास का? असाही सवाल त्यांनी केला आहे. विद्यमान सरपंच यांनी चालवलेला मनमानी कारभार मला जिवन जगण्या पासून उध्वस्त करणारा असून मला कोणाचाही आधार नसताना घर हटविण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. या सरपंचाने अशीच मनमानी चालू ठेवली तर आपण जिल्हाधिकारी साहेबांना आत्मदहनाची परवानगी मागणार असल्याचे सांगितले आहे. तरी ग्रामसेवक साहेबांनी तरी कुटील राजकारणाला सहकार्य करून माझ्या सारख्या वयोवृध्द आदिवासी महिलेवर अन्याय करू नये. असे आपल्या निवेदनातून कळविले असल्याचे एका प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.

Copyright ©