यवतमाळ सामाजिक

वीज बिल भरून सुद्धा शेतकऱ्याची वीज चालू करण्यास महावितरणची टाळाटाळ

संपादक सदानंद जाधव

वीज बिल भरून सुद्धा शेतकऱ्याची वीज चालू करण्यास महावितरणची टाळाटाळ

शेतकरी नेते किशोरजी तिवारी यांनी अधिकाऱ्यास खडसावतास 1 तासात केली वीज सुरू

दिग्रस महावितरण कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहते. पठाणी वसुली ग्राहकांची वीज तोडणे हे त्यांच्यासाठी नित्याचीच बाब झाली आहे.
अशातच रोहणा देवी शेत शिवारातील एका शेतकऱ्याची वीज मे 2021 मध्ये बिल न भरल्यामुळे कापली होती, परंतु सदर शेतकऱ्याने 23 ऑगस्ट 2021 रोजी लाईनचे बिल पूर्णपणे भरून संबंधित अधिकाऱ्याला पावती दाखवून लाईन सुरू करण्यास विनंती केली. परंतु संबंधित अधिकाऱ्याने विज जोडायची तर दूर उलट आता पावसाळ्यात लाईनच काय काम आहे असा उलट सवाल शेतकर्‍यालाच केला. जवळपास एक महिन्यापासून कार्यालयात चकरा मारून सुद्धा विज न जोडल्यामुळे शेवटी संबंधित शेतकऱ्यांनी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांना दूरध्वनीवरून याबाबत माहिती दिली असता. यावर किशोर तिवारी यांनी तत्काळ दखल घेत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्यामुळे एक महिन्यापासून कुंभकर्णी झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांना जाग आली व अवघ्या एका तासात तत्काळ शेतात जाऊन वीज सुरू केली. अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे कित्येक शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यास कोणतीही अडचण असल्यास थेट संपर्क करण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले.

Copyright ©