यवतमाळ सामाजिक

पारवा ठाणेदार यांनी वरुड भक्त गाव घेतले दत्तक

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

पारवा ठाणेदार यांनी वरुड भक्त गाव घेतले दत्तक
———————————————
शांतता व जातीय सलोखा बैठकीत केली घोषणा
———————————————
घाटंजी- पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वरूड भक्त या गावात शांतता व जातीय सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान गावातील अनेक समस्या उपस्थित महिला व पुरुष यांनी कथन केले. यावरून ठाणेदार विनोद चव्हाण यांनी ठाणेदार ग्राम दत्तक ही संकल्पना मनाशी बाळगून वरूड भक्त गाव दत्तक घेतले. तशी घोषणा त्यांनी या बैठकीत केली.
आता पर्यंतच्या इतिहासात पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस स्टेशन मध्येच शांतता व सुव्यवस्था जातीय सलोखा बाबत मोजक्या लोकांना बोलावून बैठक व्हायची मात्र नुकतेच रूजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणेदार विनोद चव्हाण यांनी ग्राम स्तरावर सुध्दा या बैठकीचे आयोजन करीत असल्याने थेट गावातील प्रत्येक व्यक्ती सोबत सबंध येत आहे. त्यामुळे जनता आपल्या गावातील समस्या बिनधास्त कथन करीत आहे. प्रत्येकाची समस्या सांगण्यास संधी मिळत असल्याने गावकरी समाधान व्यक्त करीत आहे. त्याच प्रमाणे येथिल आयोजित बैठकीत गावातील अनेक समस्या गावातील महिला पुरुषांनी मांडली या बाबीची दखल घेत ठाणेदार विनोद चव्हाण यांनी त्या सोडविण्याचा मानस पुढे ठेवून या गावाला दत्तकच घेतले त्यामुळे गावकरी भारावून गेले. या निर्णयाचा स्वागत करीत गावकऱ्यांनी ठाणेदार विनोद चव्हाण यांचेसह दुरक्षेत्र सावळी (सदोबा) चे पोलीस उपनिरीक्षक दिपक राणे व पोलीस अमलदरांचा फुलाचे वृक्ष देवून सत्कार केला. या गावाला दत्तक घेऊन व्ययक्तीक जबाबदारी स्वीकारत या गावातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करू त्यांचे समुळासह उच्चाटन कण्यासाठी प्रथम प्राधान्य देवु असे यावेळी आश्वासन देण्यात आले. सोबतच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या संकल्पनेतील डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम गुटखामुक्त समाज अभियान संपूर्ण पारवा पोलीस स्टेशन हद्दीत राबवू अशी घोषणा केली. नुकतेच पार पडलेल्या गणेश उत्सव सर्व गावातील नागरिकांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचे तंतोतंत पालन करून शांततेत पार पाडले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिपक राणे, पोलीस अमलदार हेमंतसिंग राठोड, तुषार जाधव, रवी चव्हाण, विजय नांगरे, राहुल राठोड या पोलीस कर्मचाऱ्यांसह उपसरपंच अरविंद चव्हाण, सुरेश काळे, महादेव ढेंगे, प्रकाश डांगे या मान्यवरासह गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©