यवतमाळ सामाजिक

पात्र लाभार्थ्याला डावलून अपात्र लाभार्थ्यांचां घरकुलात समावेश उपसरपंच जुनेद सय्यद याचा आरोप

जिल्हा प्रतिनिधी

पात्र लाभार्थ्याला डावलून अपात्र लाभार्थ्यांचां घरकुलात समावेश
उपसरपंच जुनेद सय्यद याचा आरोप

प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड ग्रामीण यादीमधून पात्र लाभार्थ्यांची अपात्र मध्ये निवड झाल्यामुळे गरीब गरजू लाभार्थी घरकूला पासून वंचित असल्याचा खुलासा उपसरपंच ग्रामपंचायत वाई रुई सय्यद जुनेद सय्यद निसार यांनी दिला. प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड ग्रामीण यादीमधून अति गरजु पडक्या मातीच्या घरात राहणाऱ्या लोकांना अपात्र दाखविल्यामुळे घरकुल पात्र लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र काही दलाला नी सुरू केले आहे तरी शासनाने जी पात्र अपात्र यादी ठरवली आहे त्यामध्ये पात्रलाभार्थ्या मध्ये ग्रामसभा घेऊन जशी पात्र लाभार्थ्यांची ज्याप्रमाणे प्रतीक्षा यादी तयार करण्याचे अधिकार ग्रामसभेला दिले आहे त्याचप्रमाणे अपात्र यादी मध्ये चुकीने गेलेले लाभार्थी ग्रामसभेद्वारे अपात्र यादी मधून पात्र यादी मध्ये निवड करण्याचे अधिकार शासनाने द्यावे किंवा सदर यादी चे पंचनामे पंचायत समिती मार्फत पर्यवेक्षकांची त्वरित निवड करून करावे व पात्र लाभार्थी पात्र यादी मध्ये समाविष्ट करावे अन्यथा उपसरपंच ग्रामपंचायत वाई रुई सय्यद जुनेद सय्यद निसार यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा शासनाला दिला आहे जी यादी तयार करण्यात आली ती रद्द करून ग्रामसभे मध्ये निवड होईल अशाच लाभार्थ्यांची यादी ग्राह्य धरून त्यांनाच प्राधान्य देण्यात यावे जेणे करून दलालाचे व तोतया लीडरना थोबाडीत बसेल काही दलालांनी 15 हजार द्या घरकुल घ्या असाही फंडा सुरू केला आहे प्रत्येक गावा गावात असे दलाल सक्रिय आहे त्या मुळे ग्रामसभे मधून घेण्यात येणाऱ्या यादिस प्राधान्य द्यावे व स्वत: याची पाहणीसाठी समिती गठीत करून त्याची पाहणी करावी अशी मागणी उपसरपंच जुनेद सय्यद नुसार यांनी केली आहे

Copyright ©