यवतमाळ सामाजिक

सिल्वर मेडल नी मुशफिक अली सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी

सिल्वर मेडल नी मुशफिक अली सन्मानित

उमरखेड येथील मुशफिक अली महेबुब अली या मुलाने वयोगट 17 मध्ये भाला फेक या राष्ट्रीय खेळात हरियाणा येथील रोहतक येथे चाललेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करुन द्वितीय क्रमांक पटकावला यामध्ये त्याला शिलव्हर मेडल देऊन गौरवण्यात आले या राष्ट्रीय स्पर्धेत जवळपास 17 राज्याचे खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या गावातील सर्व सामान्य नागरिक महेबुब अली यांच्या मुलाने भाला फेक या क्रिडा प्रकारात वयाच्या 17व्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविले ही यवतमाळ करांसाठी खुप कौतुक करण्यासारखी बाब आहे यवतमाळ मध्ये सुद्धा भाला फेक खेळात खेळाडू नी रुची घ्यायला हवी जेणेकरून आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधून नीरज चोपडा असे महान खेळाडू घडू शकतात. मुशफिक अली महेबुब अली या खेळाडूंची आर्थीक परीस्थिती अत्यंत हलाकीची असुन अशा खेळाडूंना प्रोत्साहन दिले तर एक महान खेळाडू घडू शकतो या भाला फेक क्रिडाप्रकारात त्याला मोलाचे मार्गदर्शन कोच श्री सागर शेरे यांचे लाभले .राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्या बद्दल तो आपले श्रेय आई शहनाज वडील महेबुब कोच सागर शेरे यांना देतो.

Copyright ©