यवतमाळ राजकीय

शेतकऱ्याच्या गुणवंत लेकीचा शिवसेना महिला आघाडीने केला सत्कार,

जिल्हा प्रतिनिधी

शेतकऱ्याच्या गुणवंत लेकीचा शिवसेना महिला आघाडीने केला सत्कार,
साठ वर्षानंतर बेलोरा( रुई )या गावात पुनः पल्लवी ने नाव लौकीक केले

यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या ग्रामीण भागातील अल्पभुधारक शेतकरी आनंदराव मानकर व सौ. कमलताई आनंदराव मानकर या कष्टाळू दाम्पत्याने मेहनीतीने आपली कन्या कु पल्लवी ला शिकवले. कु. पल्लवीने देखील आई वडिलांच्या मनातील तळमळ ओळखुन स्वतः मनाची जिद्द बाळगून आई वडिलाचेच नाहीं तर गावाचेही नाव लौकीक केले आई वडिलांच्या कष्टाचे फळ म्हणून सन्मानाची जनसेवेची कास धरून तिने आज ती स्वतः MBBS MD झाली आहे. डॉ पल्लवी मानकर हिने Seth GSMC & KEM Hospital , Mumbai येथुन MBBS केले तर MD Radiodiagnosis From Govt medical college , Sambhajinagar येथुन पुर्ण केले.
ग्रामीण भागातील एका अल्पभुधारक शेतकरी कन्येने मिळवलेल्या या यशाबद्दल शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक सागरताई पुरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख अंजली गिरी, शहर प्रमुख कल्पना दरवाई, उपशहर प्रमुख ज्योतिताई चिखलवार , गोलुभाऊ जामदे , रेखा जगताप हे उपस्थित होते.

Copyright ©