यवतमाळ सामाजिक

शहरातील आनंदनगर परिसरामध्ये साचला पाण्याचा तलाव

वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश अ. चौधरी

शहरातील आनंदनगर परिसरामध्ये साचला पाण्याचा तलाव

विद्यमान नगरसेवकाच्या, हलगर्जिपणामुळे नागरिक त्रस्त

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या आनंदनगर भागातील बालविद्या शाळे नजीक, दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे त्या संपूर्ण परिसराला तलाव सदृश्य रुप प्राप्त झाले आहे. पावसाळा लागण्यापुर्वी परिसरातील स्थानिक नगरसेवकांनी कुठल्याही प्रकारचे उपाययोजना केल्या असल्यामुळे ,नागरिकांना गंभीर परिस्थितीला समोरे जावे लागत आहे .वाहत असलेले सांडपाणी परिसरातील शाळेमध्ये आणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्यामुळे, आजाराला आमंत्रण देण्याचे काम होत आहे.
त्यामुळे स्थानिक नगरसेवकांनी यासंदर्भात उपाययोजना करून, नागरिकांच्या समस्या दूर कराव्या व परिसरामध्ये वाढणाऱ्या आजाराला आळा घालावा,असे नागरिकांनमधुन बोलले जात आहे.शहरातील नगर नगरवाला जिनिंग मध्ये ओपन स्पेस असल्याने आणि उतार भाग हा आनंदनगर परिसराकडे असल्याने,परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचे असमाधानकारक मत दैनिक नवराष्ट्र सोबत बोलतांना नगरसेविका सौ.रंजना झाडे यांनी व्यक्त केले.परंतु सांडपाण्यामुळे नागरिकांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होणार आणी रोगराईचा प्रसार होणार ही गंभीर बाब लक्षात घेऊन सुद्धा नगरसेविका असे अजबाबदार उत्तर नगरसेविकेंने देणे कितपत योग्य ?? असा सवाल उपस्थित होत आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोश व्यक्त होत आहे. त्यामुळे या समस्येची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी, अन्यथा स्थानिक नागरिक आंदोलनाचा पवित्रा स्वीकारतील असे मत अमोल मसेवार यांनी व्यक्त केले आहे.
—————————————-
आनंदनगर लगत असलेल्या नगरवाला जिनिंग मधील ,ओपन स्पेस मधील पुर्ण पाणी हे आनंद नगर मध्ये प्रवेश करते आणि आनंदनगरकडे जाणारा भाग हा उताराचा असल्यामुळे पाणीसाचण्याचा प्रकार घडतो.
:– नगरसेविका सौ. रंजना झाडे

Copyright ©