यवतमाळ राजकीय

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटंजी येथे आम् आदमी पार्टीची पार पडली बैठक

कार्यकारी संपादक राजु चव्हाण

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटंजी येथे आम् आदमी पार्टीची पार पडली बैठक
———————————————-
घाटंजी-(तालुका प्रतिनिधी) आगामी नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम् आदमी पार्टीच्या व्यूहरचना कशी असेल यासाठी जिल्हा संयोजक वसंतराव ढोके यांच्या अध्यक्षतेखाली दिनाक १७ सप्टेंबरला घाटंजी विश्राम गृह येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली.
नगर परिषद व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची निवडणूक काही महिन्यांवर असल्याचे लक्षात घेऊन या निवडणुका स्वतंत्र आम् आदमी पार्टी लढविणार असल्याने त्याची व्यूहरचना कशी असेल सोबतच कोणत्या उमेदवाराला उमेदवारी दिली गेली पाहिजे अश्या अनेक बाबी वर चर्चा करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक होती यावेळी आम् आदमी पार्टी कडून निवडणूक लढविण्यासाठी कोण उमेदवार इच्छूक आहे त्यांची नावे तातडीने पार्टी श्रेष्ठी कडे पाठवावीत. आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कोणते कार्य करायला हवे यावर वसंतराव ढोके यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. या बैठकीला जिल्हा कोषाध्यक्ष विलास वाढई, आर्णी केळापूर विधानसभा संपर्क प्रमुख प्रेमदास चव्हाण, तालुका संघटन मंत्री विठ्ठल पवार, शहर उपसयोंजक ओमप्रकाश डोहले, शहर संयोजक निखिल गिरी, तालुका उपसयोंजक दिपक घोलप, शिरोली शाखा संयोजक विठ्ठल बावणे, पंगडी शाखा संयोजक अजय गादेवार, दत्ताजी भुते यांचे सह आम् आदमी पार्टीचे कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©