यवतमाळ सामाजिक

इ पीक पेरा ॲप बंद करून तलाठी व कृषी सहाय्यकाकडून पिकाची नोदणी करावी.

गणेश धनोडे आर्णी प्रतिनिधी.

इ पीक पेरा ॲप बंद करून तलाठी व कृषी सहाय्यकाकडून पिकाची नोदणी करावी.

मनसे चे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

शेतकऱ्यांच्या पिकाची नोदणी शेतकऱ्याने स्वतः करावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ई पीक पेरा ॲप विकसित केला आहे परंतु हा ॲप शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून शासनाच्या वतीने ई पीक पेरा ॲप वर शेतकऱ्यांना पिकाची नोदणी करण्यास अडचण येत आहे यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही प्रशिक्षण न देता ॲप शासनाने दिला आहे ,गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे डिजिटल मोबाईल उपलब्ध नाही तसेच त्याचा वापर कसा करावा हे ही बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही व प्रत्येक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क सुद्धा नाही त्यामुळे माहिती डाऊनलोड करण्यासाठी शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे व आपली माहिती ॲप वर गेली की नाही याची कुठल्याही प्रकारची शास्वती होत नाही त्याकरिता शासनाच्या वतीने शेतकऱ्याची ई पीक पेरा नोदणी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या कडून करावी असे निवेदन मनसे ने आर्णी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे यावेळी मनसे आर्णी तालुका अध्यक्ष सचिन यलगंधेवर,कपिल ठाकरे व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©