यवतमाळ सामाजिक

अनाथ चुलत बहिणीच्या जागेवर भावाचा कब्जा

 जिल्हा प्रतिनिधी
———————————————
न्यायासाठी अनाथ मुलीचे शासन दप्तरी भटकंती
———————————————
यवतमाळ- तालुक्यातील वरुड (ईजारा) येथिल रहिवासी कुमारी चंदा शामराव कासार हीचे आई आणि वडील दोन्ही मयत झाल्याने चंदावर अनाथ होण्याची वेळ ओढावली. अश्यातच मोठ्या वडीलाचा मुलगा नात्याने चुलत भाऊ होत असलेले याने अनाथ बहिणीला आधार देण्याऐवजी तिचे वडिलोपार्जित जागेवर आपली हुकमत गाजवून अनाथ चुलत बहिणीला मारहाण करून स्वतःचे बांधकाम त्या जागेवर करून चंदाच्या जीवन पटलावर आणखी अडचणी वाढविल्या आहे.
वरूड (ईजारा) येथिल गरिबीच्या सावटात जगणाऱ्या कासार कुटुंबातील आई व वडील दोन्ही मयत झाल्याने त्यांच्या पोटी असलेली चंदा नामक मुलगी अनाथ झाली. अश्यातच तिला कोनी सहारा देण्यास तयार नसल्याने तिने वरुड येथीलच आपल्या मामाकडे आसरा शोधून ती मामाकडे राहू लागली आणि कसे बसे जिवन जगू लागली. याचाच फायदा घेत तिचे मोठे वडील यांचा मुलगा हुसेन बंडू कासार हा चंदाचा चुलत भाऊ तिला आसरा देवून जीवनमान जगण्यास मदत करणे गरजेचे होते. मात्र याऊलट त्याच्या स्वार्थ नीतीने चंदाच्या वडीलाची असलेल्या जागेवरच डल्ला मारून आपले बस्थान मांडत बांधकाम केले. याबाबत भयभीत झालेली चंदा या चुलत भावाकडे जावून सदरची जागा माझ्या मालकीची असून तसे सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहे. प्रथमच मी जिवन जगताना खचली आहे. त्यामुळे असा हुकमशहीचा बडगा उगारू नका. मी दुसऱ्या कडे राहतो त्यामुळे माझ्या जागेवरील आपण केलेली मालकी हटवा अशी विनंती केली असता स्वार्थी चुलत भावाने तिला आधार देण्यापेक्षा तिला थापड बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत जिवाने मारून टाकण्याची धमकी दिली. याबाबत तहसिलदार यांचे कडे सुध्दा लेखी निवेदन देवून न्याय मागितले पण त्याचा कोणताही फायदा झाला नसल्याचे चंदाने निवेदनात म्हटले आहे. या प्रकारची लाडखेड पोलीस स्टेशनला सुध्दा तक्रार केली आहे. यावरून त्यांचे विरोधात कलम ३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ते या गुन्ह्याला मी घाबरत नसल्याचे सांगत फिरत आहे. त्यामुळे पोलिसात तक्रार देवून सुध्दा फायदा झाल्याचे दिसून येत नसल्याने अनाथ चंदाने अखेर जिल्हाधिकारी साहेब न्याय देतील काय? या आशेने ती निवेदन देवून न्यायासाठी टाहो फोडला आहे. अनाथांना मदत करण्यासाठी अनेक हात सरसावतात मात्र वरुड ईजारा या ठिकाणी अनाथ मुलीच्या राहच्या जागेवर डल्ला मारून माणुसकीला धर्माला कलंक लावीत असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे. त्याशिवाय प्रशासनाकडे न्यायाची अपेक्षा बाळगून निवेदन सादर केली. यात प्रशासनाची हतबलता त्यांचे कार्य वांझोटी ठरत असल्याने अनाथ चंदाला अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था पुढे सरसावून न्याय मिळवून देतील काय? अशी अपेक्षा बाळगून आहे.

Copyright ©