यवतमाळ सामाजिक

समाजरत्न सम्मान पुरस्काराने अमनभाई सम्मानित

यवतमाळ- येथील महाराष्ट्र ह्युमन राईटस जस्टीस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अमनभाई यांना समाजरत्न सन्मान पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना 11 सप्टेंबर रोजी जय भिमायक कोलाम समाज कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था मासोळी ता.जि. यवतमाळ यांनी प्रदान केला आहे. यवतमाळातील तमाम गोर गरीब मजुरांना अन्नदान, वस्त्रदान आणि वस्त्रदान व अर्थदान देवून अमनभाई यांनी सहानुभूतीने मानवतेचे दर्शन घडविले. यासाठी मानवतावादी, परोपकारी व सेवाभावी वृत्तीची दखल घेवून त्यांच्या अजोड कार्याचा सन्मानरत्न म्हणून गौरव करण्यात आला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुभाष शंकर कासार यांनी सांगीतले. या पुरस्कारकरीता अमनभाई यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.

Copyright ©