यवतमाळ सामाजिक

ई-पीक पाहणीच्या दबावातून तलाठ्यांच्या मृत्यूनंतरही प्रशासन सुस्तच

घाटंजी -संपर्ण राज्यभर ई-पीक पाहणीच्या सदोष मोबाईल ॲप व चुकीच्या अंमलबजावणीतून वरीष्ठ महसूल अधिकारी यांचे दबावाखाली मानसिक खच्चीकरण होवून आर्णी तालुक्यातील तलाठी अजय पस्तापुरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याकरीता विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळने संबंधित दबाव निर्माण करणा-यांवर कारवाई करून तलाठी पस्तापुरे यांचे कुटुंबीयांना मदतीची मागणी केली आहे.
मय्यत तलाठी अजय पस्तापुरे यांचे १२ तारखेला मृत्यू झाल्यानंतर दि. १५ सप्टेंबर २०२१ पासून जिल्ह्यातील तलाठी यांनी विविध टप्प्यांत आंदोलनास सुरवात करण्यात आली असून देखील अद्याप प्रशासनाकडून कुठलीच दखल घेण्यात आलेली नाही यावरून महसूल विभागातील महत्वाच्या व ज्याकडून नेहमी दबावतंत्राचा वापर करून शासनाच्या योजना तसेच उपक्रम पुर्णत्वास नेण्यात येतात परंतू वरीष्ठांच्या दबावात तलाठी यांच्या मृत्यूमुळे तलाठ्याच्या परीवारावर दु:खाचा डोंगर ओढावला असतांना प्रशासन सुस्त भुमिका घेवून असल्याने तलाठी संवर्ग व त्यांचे कुटुंबीयविषयी प्रशासनाची अनास्था असल्याची धारना तलाठी संवर्गात निर्माण झाली आहे.
आर्णी येथिल तलाठी अजय पस्तापुरे यांना न्याय मिळावा याकरीता विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळने पुकारलेल्या आंदोलनाच्या दुस-या टप्प्यात यवतमाळ उपविभागातील आर्णी, यवतमाळ व बाभुळगाव तालूक्यातील सर्व तलाठी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे यवतमाळ उपविभागात चालू असलेल्या धरणे आंदोलनाला विदर्भ पटवारी संघ नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष श्री. बाळकृष्ण गाढवे यांनी भेट दिली जर तलाठी अजय पस्तापुरे यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाची तीव्रता आनखी वाढविनार असल्याचे सांगितले तेव्हा जिल्हा अध्यक्ष कामराज चौधरी, उपाध्यक्ष संजय मारकड, सचिव पवन बोंडे,सहसचिव विनोद अक्कलवार , कोषाध्यक्ष रूपेश थोटगे केळापूर उपविभाग अध्यक्ष चेतन ठाकरे उपस्थित होते.
“यवतमाळ जिल्ह्यातील तलाठी यांचे मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची तिव्रता वाढविण्यात येईल”
बाळकृष्ण गाढवे
केंद्रीय अध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ नागपूर
“ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे सदर घटना घडली आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत चालूच राहील”

कामराज चौधरी
जिल्हाध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ यवतमाळ
“तलाठी पस्तापुरे व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत जिल्ह्यातील तलाठी नियोजित टप्प्यात आंदोलन चालूच ठेवनार आहे”
पवन बोंडे
जिल्हा सचिव, विदर्भ पटवारी संघ यवतमाळ

Copyright ©