यवतमाळ सामाजिक

महीला ग्रामसेविकेला ठेवले डांबुन,महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

तालुक्यातील बाबापुर येथील ग्रामसेविकेला गावातील सचिन पिदुरकर याने ग्रामपंचायत कार्यालयात ,डांबुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.गावातीलच सचिन मोहन पिदूरकर असे ग्रामसेविकेला कार्यालयात डांबणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तालुक्यातील बाबापूर ग्रामपंचायत कार्यालयात स्मिता गणेश काळे ही ग्रामसेविका काम करत असताना,
सचिन मोहन पिदुरकर हा कार्यालयात येऊन अरेरावी
करायला लागला .आणी कार्यालयाचे दार बंद करून, जीवे मारण्याची धमकी देत निघून गेला.सचिन पिदूरकर हा नेहमीच ग्रामपंचायत कार्यालयात येवून किंवा फोनवर नेहमीच माहिती मागत असतो. मुलांसाठी एस टी बसने येण्या-जाण्या करिता ग्रामपंचायतीचा ठराव डेपोत का दिला नाही व माहिती अधिकारात मागितलेली माहिती मिळाली नाही. असे म्हणून तो चिडून कुलुप लावुन निघुन गेला. अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार महिला ग्रामसेवक कर्मचाऱ्यांसोबत घडल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ १३७० च्या वतीने गटविकास अधिकारी यांना संघटनेचे अध्यक्ष एम.जे.माने व सचीव एच. व्ही. गिरीगोसावी व समस्त पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिऊन निषेध नोंदविला आहे.

Copyright ©