यवतमाळ सामाजिक

विविध मागण्यासाठी सावळी सदोबा येथे धरणे आंदोलन .

सावळी सदोबा येथे विविध मागण्यांच्या साठी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी दिनांक 24 सप्टेंबर 2021 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे लेखी पत्र मा. जिल्हाधिकारी यवतमाळ , मा. तहसीलदार आर्णी , कनिष्ठ अभियंता महावितरण आर्णी , जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ , पारवा पोलीस स्टेशन यांना दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की ,
सावळी सदोबा व परिसरातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे जवळपास बाराशे लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही .
त्यामुळे वृद्ध , निराधार व अपंग यांच्यावर एक प्रकारे उपासमारीची पाळी आलेली आहे. ही बाब लक्षात घेता यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी व तहसीलदार आर्णी यांना लेखी पत्राद्वारे 23 सप्टेंबर 2021 पर्यंत श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात दि.23 सप्टेंबर 2021 गुरूवार पर्यंत अनुदान जमा झाले नाही तर दिनांक 24 सप्टेंबर 2021 पासून सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा लेखी स्वरूपात इशारा दिलेला आहे.
तसेच सावळी सदोबा व परिसरात गेल्या महिन्याभरापासून विद्युतच्या सततच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झालेले आहे , विद्युत मंडळाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात परंतु प्रत्यक्षात विद्युत सुरळीत सुरू करण्यासाठी कोणताही प्रयत्न करीत नाही .
विद्युत नियमितपणे सुरळीत सुरू राहावी यासाठी मुबारक तंवर यांनी कनिष्ठ अभियंता आर्णी च्या कार्यालयाला लेखी पत्राद्वारे मागणी केलेली आहे.
23 सप्टेंबर 2021 गुरुवार पर्यंत या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास 24 सप्टेंबर 2021 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता नायब तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असा इशारा त्यांनी लेखी रुपात दिलेला आहे तसेच फडणवीस सरकार व ठाकरे सरकार यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत सावळी सदोबा सर्कल मधील जवळपास एक हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिलेले आहे.
कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तातडीने वर्ग करण्यात यावी अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुबारक तंवर यांनी मा‌. जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक , यवतमाळ यांना लेखी पत्राद्वारे दिलेला आहे.

Copyright ©