यवतमाळ सामाजिक

आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या महिलेला अटक कधी होणार

 

अनिल उबाळे च्या आत्महत्याला सात दिवस उलटून सुध्दा आरोपी महिलेला अटक करण्यात पोलीस प्रशासन अपयशी

दिग्रस येथील सफाई कामगार अनिल उबाळे यांनी दिनांक 8/9/2021 रोज बुधवार ला विष प्राशन करून चित्रफित बनवून समाज माध्यमावर प्रसारित केली त्या चित्रफिती मध्ये .मी अनिल उबाळे नगरपरिषद सफाई कामगार अर्चना अरविंद राठोड शिवसेना महिला शहर अध्यक्ष हीच्या नाहक जाताला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्या चित्रफीती मध्ये स्पस्ट उल्लेख केला आहे.अर्चना राठोड ही मला वेळोवेळी पैशाची मागणी करत होती व धमकी देत होती तिला यापूर्वी बरेचदा पैसे देऊन सुद्धा तिने मला पुन्हा पाच लाख रुपये मागितले मी कर्ज काढून दोन लाख रुपये तिला दिले सुद्धा व पुन्हा तीन लाख रुपयाचा सततचा तगादा तिने लावून धरला होता मी या बाईच्या जाताला कंटाळून माझी जीवन यात्रा संपवीत आहे माझ्या मृत्युनंतर मला न्याय मिळावा अशी अर्थ हाक चित्रफितीच्या माध्यमातून केली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी अनिल उबाळे यांच्या पत्नीने दिनांक 09/09/2021 रोज गुरुवारला पोलीस स्टेशन येथे येऊन आरोपी महिले विरुद्ध तक्रार दाखल केली होती तक्रारीच्या अनुषंगाने दिग्रस पोलीस स्टेशन मध्ये अर्चना अरविंद राठोड हिच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते व दिग्रस पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोनाजी आमले यांनी अनिल उबाळे यांच्या पत्नीला व नातेवाईकांना 12 तासाच्या आत आरोपीला अटक करू असे आश्वासन दिले होते मात्र सात दिवस होऊनही आरोपीला अटक करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने अनिल उबाळे च्या नातेवाईकांनी आज दिनांक 14/09/2021 रोज मंगळवार ला दिग्रस चे तहसीलदार व दिग्रस पो.स्टे. चे ठाणेदार सोनाजी आम्ले यांना पुन्हा निवेदन देऊन त्या आरोपीस तात्काळ अटक करावी  व 12 तासाच्या आत अटक न झाल्यास उग्र आंदोलन करू असे निवेदनातून म्हटले आहे

निवेदन देतेवेळी संजय मारोतराव कदम, नितीन ढाकणेकर,शंकर ठाकरे ,गफार ठेकेदार, शंकर उबाळे,शुभम सरोदे ,नितेश बारहाते ,निलेश कनाके, संदीप उबाळे, रुपेश बराहाटे, ,प्रदीप उबाळे ,मोहन गीरे, लकी ,शिवा चौधरी, नगरसेवक सय्यद अक्रम,
संजय खंडारे, अरुण मुळे ,सौरभ कदम ,इमरान, अतिक मौलाना ,म मोहसीन, अमोल बराटे ,बाबुराव कदम ,रितिक संजय कदम, अजून  मोरे, संघर्ष गजानन कासार, प्रतीक मोरे ,किसन डोईफोडे ,कल्पना पवार ,शिल्पा खंडारे या सह मृताचे अनेक नातेवाईक उपस्थित होते

Copyright ©