यवतमाळ सामाजिक

ई-पिक पाहणी कर्तव्यावर असतांना तलाठी यांचा मृत्यू

——————————————–
विदर्भ पटवारी संघ घेनार आंदोलनात्मक पवित्रा
——————————————–
घाटंजी- संपुर्ण राज्यभर शेतकरी यांनी स्वत:च्या शेतातील फिकांच्या नोंदी ७/१२ वर स्वत: नोंदवाव्यात याकरीता ई- पिक पाहणी प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. परंतू या प्रकल्पाच्या चुकीच्या अंबलबजावणीमुळे व ई-पिक पाहणीचे काम गुनात्मक न करता संख्यात्मक व्हावे याकरीता वरीष्ठांच्या दबावातून जिल्ह्यातील तलाठ्याला स्वत:चा जिव गमवावा लागला.
जमाबंदी आयुक्त पुणे यांनी दि. १५ ऑगष्ट २०२१ पासून राज्यात ई-पिक पाहणी प्रकल्पाची अंबलबजावणी चालू केली असून त्याकरीता एक कार्यपद्धती म्हनून एक परीपत्रकदेखिल प्रसिद्ध केले आहे . त्यानुसार तलाठी व कृषी सहाय्यक यांनी १०% तपासणी करावी तसेच तलाठी यांनी शेतकरी यांचेकडून नोदविले पिकपेरे मिडल वेअर चा वापर करुन तपासून अद्यावत करावे तसेच कृषी विभाग यांनी जनजागृती, प्रचार ,प्रसिद्धी , खातेदारांची नोंदनी,अधिकारी व कर्मचारी यांची क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळा घेणे व प्रकल्पाचे पर्यव्यक्षण करावी असे परीपत्रकात स्पष्ट नमुद आहे परंतू यवतमाळ जिल्ह्यात वरीष्ठांना सदर परीपत्रकाचा विसर पडल्याने ई-पिक पाहणीची संपुर्ण जबाबदारी केवळ तलाठी यांचेवर सोपविण्यात आली आहे त्यासाठी तलाठी यांचेवर कारवाईची भिती दाखवून मोठ्या प्रमाणात दबाव आनल्या जात आहे व त्यातून ग्रामिण भागात शेतकरी वर्गाकडून फारसा अनूकूल प्रतिसाद नसताना तलाठी संवर्गाकडून काम करुन घेतल्या जात आहे. त्याकरीता यापुर्वीच परीपत्रकानूसार योजनेची अंबलाजावणी व्हावी म्हणून विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ कडून जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देखिल देण्यात आले होते.
ई-पिक पाहणी करीता वरीष्ठानकडून निर्माण करण्यात आलेल्या दबावातून श्री. अजय पस्तापूरे तलाठी बोरगाव ता. आर्णी जि. यवतमाळ सुटीच्या दिवशी कारवाईच्या भितीपोती वरीष्ठांच्या दबावामुळे निर्माण झालेल्या प्रचंड तानाखाली ई-पिक पाहणी चालू ठेवली अश्यातच ई-पिक पाहणी करून गौरी अव्हाणासारख्या महत्वाच्या दिवशी त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटूंबाने कर्ता व्यक्ती गमावला आणि हे केवळ ई-पिक पाहणीच्या चुकीच्या अंबलबजानितून निर्माण झालेल्या दबावामुळे झाले जर वरिष्ठानकडून वेळीक परीपत्रकानुसार कार्यवाही झाली असती तर पस्तेपुरे यांचे कुटुंबीयांवर हि वेळ आली नसती या घडलेल्या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही तलाठी संवर्गात प्रचंड रोष निर्माण झाला असून तलाठी अजय पस्तेपुरे यांचेवर दबाव निर्माण करनार्‍या संबंधितांवर कारवाई व्हावी व त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी याकरीता विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ यांचेकडून आंदोलनाची भुमिका स्पष्ट करनारे निवेदन जिल्हा अध्यक्ष कामराज चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली देण्यात आले. तसेच जोपर्यंत परीपत्रकानूसार ई-पिक पाहणी प्रकल्प राबविण्यात येनार नाही तोपर्यंत जिल्ह्यातील तलाठी ई-पिक पाहणीची आतापर्यंत करीत असलेली प्रचार – प्रसिद्धीही नम्रपणे नाकारत असल्याचे स्पष्ट केले.
विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ यांचेकडू तलाठी अजय पस्तापुरे व त्यांच्या कुटूंबियांना त्वरीत न्याय मिळावा याकरीता दि. १५ सप्टेंबर २०२१ पासून विविध नियोजीत टप्यांत जिल्ह्यातील तलाठी आंदोलन करनार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. यावेळी विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळचे उपाध्यक्ष संजय मारकड, सचिव पवन बोंडे, सहसचिव विनोद अक्कलवार, कोषाध्यक्ष रुपेश थोडगे उपविभाग शाखा यवतमाळचे अध्यक्ष कृष्नकांत दांडेकर सचिव धिरज पत्रे सह तलाठी उपस्थित होते. असे सचिव बोंडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
“परीपत्रकानुसार मागणी करुनही कार्यवाही न झाल्याने व वरीष्ठांच्या दबावामुळे तलाठी अजय पस्तापुरे यांना जिव गमवावा लागला मागण्या पुर्ण होवून त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन कायम ठेवण्यात येईल. “
कामराज चौधरी
अध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ
“नियमानूसार ई-पिक पाहणी प्रकल्पाची अंबलबजावणी न करता जर वरीष्ठांनी फक्त तलाठी यांचेवर दबाव आनण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येईल. “
बाळकृष्ण गाढवे
केंद्रीय अध्यक्ष, विदर्भ पटवारी संघ नागपूर तथा सरचिटणीस तलाठी,पटवारी, मंडळ अधिकारी समंवय महासंघ, महाराष्ट्र राज्य.

Copyright ©