Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2161 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि. 14 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात तीन व बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण चार आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 884 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 883 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72867 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71076 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये झरी जामणी तालुक्यातील एका पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 33 हजार 110 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 60 हजार 168 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.94 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.11 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2161 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2161 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 13 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 774 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

वसतीगृहाच्या तपासण्या नियमित करून परिपुर्ण सुविधा उपलब्ध कराव्या

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

ऊसतोड कामगारांना ग्रामसेवकांमार्फत ओळखपत्र देणार

दक्षता समितीला प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना

यवतमाळ दि. 14 सप्टेंबर : वसतीगृह व निवासी शाळा सध्या कोरोनामुळे बंद असल्या तरी शासनाच्या सूचनांनुसार पुढे सुरू होतीलच मात्र तोपर्यंत तेथील तपासण्या न थांबविता नियमितपणे करण्यात याव्या तसेच वसतीगृहातील स्वच्छता, किरकोळ दुरूस्त्या व प्राथमिक सुविधा परिपुर्ण राहतील याकडे वसतीगृह समितीने लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

जिल्हास्तरीय वसतीगृह निरीक्षण समितीची सभा, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे तसेच जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक आढावा सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज महसूल भवन येथे घेण्यात आली. याप्रसंगी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद कचरे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील ज्या भागात मागील तीन वर्षापासून ऊसतोड कामगार म्हणून कार्यरत असणाऱ्या कामगारांना ग्रामसेवकांमार्फत सर्वेक्षण करून ओळखपत्र देण्याच्या सूचना दिल्या. तसेच दक्षता समितीचा आढावा घेतांना प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे तसेच विशेष पथम नेमून फरार आरोपींचा शोध घेण्याचे व विहित मुदतीत संबंधीतांवर गुन्हे नोंदविण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला समाज कल्याण, आरोग्य, शिक्षण, पोलीस, सहकार, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

यवतमाळ दि. 14 सप्टेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हे दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरूवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे आगमन व राखीव. दु. 1.30 वा. स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यक्रमास समर्थ लॉन, आर्णी रोड येथे उपस्थिती. दु. 2.30 ते 3 राखीव. दु. 3 वा. पुरग्रस्त, प्रकल्पग्रस्त, पुनर्वसन, कोविड-19, ओबीसी-व्हीजेएनटी आश्रमशाळा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 4.15 वा. स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वा. नागपूरकडे प्रयाण.

Copyright ©