Breaking News यवतमाळ सामाजिक

जीव वाचवणारा अजिंक्य ठरत आहे, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय

 

परिवारातील गंभीर व्यक्तींची परवा न करता , (युवा सेना उपजिल्हा प्रमुख) अजिंक्य शेंडे धावला इतरांच्या मदतीसाठी

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पोळा, गणेशोत्सव, महालक्ष्मी पूजन, अशा हिंदु धर्माचे सन सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकांची या गावावरून त्या गावाकडे ये-जा करण्यासाठी मोठी लगबग लागलेली असते. अशीच लगबग दीड दिवसाचा गणपती विसर्जनाच्या दिवशी लागलेली असतांना ,शहरातील टिळक चौक परिसरामध्ये अजिंक्य शेंडे नामक एक युवक, हा भाजीपाला घेण्यासाठी आलेला असतांना. चौकामध्ये वणी वरून वरोरा मार्गे चंद्रपूरसाठी परिवहन महामंडळाची बस येऊन उभी राहिली. आणि टिळक चौकातून प्रवासी घेऊन पुढच्या प्रवासाला लागली. सोबतच अजिंक्य सुद्धा काही कामानिमित्त खरेदी-विक्री कार्यालय जवळ नुकताच, टिळक चौकातुन आला होता. त्याच्या नजरेसमोरून चंद्रपूर साठी निघालेली परिवहन महामंडळाची बस गेली. आणि त्याची नजर बसच्या डाव्या चाकावर पडली. आणि अजिंक्यच्या लक्षात आले की, बसचे चाक काही अंतरावर जाऊन निघून जाईल. आणि सुसाट वेगाने सुटलेली बस ही काही क्षणातच जमीनदोस्त होईल. याच गोष्टीचे गांभीर्य जपत अजिंक्यने त्या बसचा,आपल्या दुचाकीने पाठलाग करून, त्या बसला प्रगतीनगर जवळ थांबविले. आणि वाहनचालकांना यासंदर्भात कल्पना दिली. बसचा तो चाक बघताच, संपूर्ण प्रवासासी थक्क झाले. आणि प्रवाशांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.त्यामुळे जीव धोक्यात टाकून बस थांबविणाऱ्या अजिंक्य शेंडेचे प्रवाशांनी आभार मानले. आणि मोठी होणारी दुर्घटना निवळली.व प्रवाशांचे प्राण वाचले.
—————————————-
टिळक चौकामध्ये बस चाकावरती लक्ष गेल्यावर लक्षात आले की त्या चाकामध्ये , काहीतरी बिघाड आहे. परंतु चाकाची दिशा बदलेली असल्याने ,कदाचीत तो भास असावा असे मला वाटले. परंतु विक्री कार्यालयाजवळुन पुन्हा ती बस जाताच, बस मध्ये बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे युवासेनेचा छावा असल्याने, मदत करण्यासाठी मी धावुन गेलो!!!
युवासेना उपजिल्हाप्रमुख :— अजिंक्य शेंडे

Copyright ©