यवतमाळ राजकीय

राजकारणातील असेही एक पान; यवतमाळ जिल्ह्याचे पहिले शिवसेना जिल्हाप्रमुख कुठे व कसे आहे ?

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुका नेहमीच लक्षवेधी राहिला आहे. राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो , उद्योग असो किंवा मग शैक्षणिक विषय असो दिग्रस तालुका नेहमीच चर्चेत राहतो. आज चर्चा आहे ती एका अशा व्यक्ती बाबत की ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणाऱ्या एका संघटनेचे ध्वज हाती घेतले होते त्या व्यक्ती ची. सध्या ते कुठे आणि कसे आहे या बाबत जिज्ञासा वाटली म्हणून हा वृत्त विषय. आणि ही दखल घ्यावी वाटलीत्यांच्याच कुटुंबियानी सोशल मीडियावर मांडलेल्या व्यथे मुळे.

होय गोष्ट आहे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेनेची. या पक्षा करिता एकेकाळी स्वताचे आयुष्य वाहून घेतलेल्या एका माजी जिल्हा प्रमुखाची यशवंत उपगनलावार यांची सध्या त्यांची राजकीय सक्रियता दिसत नाही. 1990 मध्ये जेव्हा ते दिग्रस विधानसभा करिता शिवसेनेचे उमेदवार होते त्यावेळेस शिवसेनाप्रमुख श्रीमंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे 20 मार्च 1990 ला त्यांच्या प्रचारासाठी आल्याची बाब दिग्रस येथील वरिष्ठ शिवसैनिक पुनम पाटील यांनी सांगितली आहे.

त्या वेळेस या निवडणुकीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचे पहिले शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत उपगनलावार यांच्या बद्दल हे लक्षवेधी वृत्त, सध्या ते कुठे आणि कसे आहे. कारण की राजकारणाच्या पुस्तकातील नवीन पान उघडल्या गेलं की जुने पान क्वचितच उघडून पाहिल्या जाते. तशीच स्थिती त्यांच्या बद्दल दिसून येत आहे. १९९० मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या तेंव्हा यशवंत उपगनलावार दिग्रस
आर्णी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना कडून उमेदवार होते. यशवंत उपगनलावार यवतमाळ जिल्ह्याचे पहिले शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत. परंतु सध्या च्या राजकारणामध्ये मागील अनेक दिवसापासून चर्चेत नाहीत. याचा अर्थ असा नाही की त्यांनी शिवसेना सोडून दिली असेल. त्याचे कारण काही ही असो परंतु शिवसेनेच्या जडण-घडण मधील यवतमाळ जिल्ह्याचे त्यावेळेस त्यांचे योगदान विसरता येणार नाही. परंतु सध्या यशवंत उपगनलावार आहेत कुठे, कसे आहेत. या बाबत त्यांची शिवसेने कडून विचारणा होईल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. सध्या त्यांच्या कुटुंबातील सदस्य धनंजय याने सोशल मीडियावर या बाबत हाक दिली आहे ती ही खुद्द शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे यांना. या बद्दल दूरध्वनीवर त्याला विचारले असता त्यांनी ही खंत व्यक्त केली की ज्या पक्षा साठी त्यांनी मेहनत घेतली त्यांच्या कडून साधी विचारणा देखील होत नाही. पण तरी मिळावा, विचारपूस तरी व्हावी. ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे काय, असे त्यांनी बोलून दाखविले. नक्कीच या बाबत विचार होणे गरजेचे आहे. आपला कार्यकर्ता टिकला पाहिजे, जुळला पाहिजे, जुळून राहिला पाहिजे, हे शिवसेनेचे धोरण राहिले आहे. यशवंत उपगनलावार यांच्या बाबत शिवसेना काय सिध्द करेल हे पुढे कळेलच.

Copyright ©