यवतमाळ सामाजिक

ई पिक पेरा संबंधात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लाडखेड- माझी शेती माझा सातबारा मिच नोंदविणार माझा पिक पेरा या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला दारव्हा महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याच्या कार्याला सुरुवात झाली असून तहसिलदार सुभाष जाधव यांनी ई पिक पेरा करण्यासंदर्भात स्थानिक ग्राम पंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
शासन स्तरावरील नानाविध योजनेतील लाभ घेण्यासाठी वास्तवात शेतातील पेरा सातबाऱ्यावर यावे. त्यानुसार शासनाकडून मिळणारे लाभ शेतकऱ्यांना मिळवा यासाठी ई पिक पेरा करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. यात पिक पेरा भरताना सातबारा वरील एखादी रकाना कोरा राहिल्यास त्या शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या लाभापासून वंचित राहायची वेळ येवू शकते. त्यामुळे तशी वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येवू नये. यासाठी या अप वरून स्वतः शेतकऱ्याने आपला पेरा कसा भरावा यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेणे सुरू आहे. त्यानुसार लाडखेड ग्राम पंचायत कार्यालयात दारव्हा तहसिलदार सुभाष जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच माणिकराव चिरडे यांचे सह तलाठी बी. एम. धोटे हे उपस्थित होते. दरम्यान तलाठी धोटे यांनी पिक पेरा कसा नोंद करायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. व शेतकऱ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवून या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Copyright ©