Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2160 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि. 13 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर कोणीही कोरोनामुक्त झाले नाही. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात चार व बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण पाच आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 405 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 404 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72866 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71074 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटीव्ह आलेला रुग्ण इतर शहरातील आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 32 हजार 225 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 59 हजार 279 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.95 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.25 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2160 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 14 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2160 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 776 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

बालकांसाठीच्या जंतनाशक औषधीचे महत्व पालकांना सांगावे

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आरोग्य विभागाला सूचना

 

· जिल्ह्यात कोविड लस मुबलक प्रमाणात उपलब्ध

· प्रती दिवशी 50 हजार डोजचे लक्ष पूर्ण करावे

 

यवतमाळ दि. 13 सप्टेंबर : देशात 1 ते 14 वर्ष वयोगटातील किमान 68 टक्के बालकांमध्ये आतड्यांचा कृमी (जंत) दोष आढळतो. जिल्ह्यात या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी बालकांना व त्यांचे पालकांना दिनांक 21 सप्टेंबर रोजीच्या जंतनाशक मोहिमेत जंतनाशक औषधीचे महत्व सांगून प्रत्यक्ष गोळी देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जंतनाशक व कोविड जिल्हा कार्यबल सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया, डॉ. टि.ए.शेख, डॉ. विजय अग्रवाल उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की जंतनाशकामुळे रक्तक्षय कमी होतो, बालकांची वाढ लवकर होते, अन्य संसर्गाला प्रतिकार करण्याची क्षमता वाढते व बालक निरोगी बनून अधिक क्रियाशील बनतात. बालकांचे आरोग्य व जीवनाचा दर्जा सुधरावा यासाठी दि. 21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत 1 ते 19 वयोगटातील सर्व बालकांना जंतनाशकाच्या गोळ्या घरोघरी जावून देण्याचे व यासाठी अशा वर्कर व अंगणवाडी सेवीका यांची मदत घेण्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी कोविड लसीकरणाचाही आढावा घेतला. जिल्ह्यात कोविड लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असून आरोग्य विभागाने कोविड लसीकरणाची गती वाढवून प्रती दिवशी 50 हजार डोजचे लक्ष पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच पहिला डोज घेतल्यानंतर नागरिकांनी दुसरा डोज घेवून लसीकरण पुर्ण करण्यासाठी सर्व तालुका टास्क फोर्स व ग्रामस्तरीय समितीने नियोजनपुर्वक प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©