यवतमाळ सामाजिक

भाई अमन फ्रेंड्स ग्रुप ची आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत

लाडखेड : यवतमाळ येथील भाई अमन फ्रेंड्स ग्रुप च्या वतीने लाडखेड येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्या च्या कुटुंबाला नुकतीच आर्थिक मदत करण्यात आली येथील संजय बाबूजी दुधे वय ४० वर्ष या तरुण शेतकऱ्या ने मागील महिन्यात कर्ज बाजारी पणा मुळे स्वतःच्या शेतातील विहरीत उड़ी घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली सदर शेतकऱ्यांच्या मागे वुध्द आई ,पत्नी ,एक मुलगा,एक मुलगी,व तिनभाऊ असा आप्तपरिवार आहे या आत्महतेच्या घटने ची माहिती येथील दिनेश सिनखोपडे (पाटिल) यांना मिळताच त्यांनी भाई अमन ग्रुप चे अध्यक्ष श्री भाई अमन यांच्याशी संपर्क करून सदर घटने ची माहिती दिली सदर माहिती ची दखल घेत भाई अमन आपल्या सहकार्यां सोबत लाडखेड पोहचले व अत्महत्या केलेल्या संजय दुधे यांच्या पत्नीस दहा हजार रुपया ची आर्थिक मदत केली या वेळेस दिनेश सिनखोपडे (पाटिल)येथील ग्राम पंचायत सरपंच माणिकराव चिरडे मोहम्मद खान राजू धोटे सुनील नागापूरे डॉ गणेश नाईक प्रदीप मेश्राम परवीन इंगोल व अनेक गांवकरी मंडळी उपस्थित होते

Copyright ©