यवतमाळ सामाजिक

पांढरी येथे आरोग्य शिबीर उत्साहात

पांढरी घोडखिंडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने 10 सप्टेंबर रोजी पांढरी येथील सेवालाल महाराज मंदिरात आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले यावेळी कार्यक्रमाला सरपंच भारती संदीप येटरे उपसरपंच किसन येलकर सचिव प्रेमानंद डाखोरे ग्रामपंचायत सदस्य बाबुसिंग तुरी आशिष पारधी तसेच जनलर फिजिशियन सर्जन डॉ. पठाण स्त्री रोग तज्ञ डॉ. पूजा पद्मावार उपस्थित होते यावेळी पठाण हॉस्पिटल मार्फत गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली तसेच डॉ. पठाण यांनी गावातील नागरिकांना डेंग्यू सारख्या आजारावर मार्गदर्शन केले सरपंच भारती येटरे यांनी गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी गावात विविध उपाय योजना करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला होते

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©