यवतमाळ सामाजिक

भारतीय पिछडा ओ. बी.सी. शोषित संघटना नवी दील्ली व्दारा घाटंजी तालुका येथे ओ. बी. सी. बारा बलुतेदार- अलुतेदार अध्यक्ष पदी सतिश मलकापूरे यांची निवड

घाटंजी- तालुक्यातील ओ. बी.सी.समाजातील सर्व समाविष्टीत जाती पोटजाती ची मिटींग विलास काळे साहेब भारतीय पिछडा ओ बी सी वर्ग संघटन केंद्रीय प्रतिनिधी, प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे. प्रमोद राऊत जिल्हा अध्यक्ष. ज्ञानेश्वर रायमल. याच्या उपस्थितीत शिंपी समाज मंदीर घाटंजी येथे पार पडली. ओ बी सी समाजाची स्वतंत्र जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. सर्व ओ बी सी घटकाचा शासकिय सेवेत भरणा करण्यात यावा. मेघा भरती विशेष मोहीम व्दारे करण्यात यावी. महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, या जिल्ह्यातील काढलेले आरक्षण पुर्ववत 19.℅ करावे यासारख्या इतर होत असलेल्या जाचक व अन्यायकारक मुद्दे या बैठकीत घेण्यात आले. विशेष म्हणजे घाटंजी तालुक्यातील संघटना मजबुती करण्यासाठी सतिश मलकापूरे यांची तालुका अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. सचिव पदी सचिन ना. कर्णेवार यांची ही नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख महेश पवार, मधुकर निस्ताने, मोरेश्वर वातीले, कटकोजवार सर, साखरकर सर, अनंतराव चौधरी, जितेंद्र जुन घरे, सुनिल हुड, शंकरजी लाकडे, ए एम मानकर, संदीप माटे, पांडुरंग निकोडे, पंकज नरसेकर, राजु दिकुंडवार, विजय गोबाडे, ज्ञानेश्वर पोटपेलीवार, दत्तात्रय पिल्लेवार, दिपक नित, गोलु फुसे, संजय दिकुंडवार, आशिष साखरकर सर, नितीन गोल्लर, राजेंद्र गोबाडे, अमोल कर्णेवार, शंकर लेणगुरे, गजानन लाकडे, कवडी पोटपेलीवार, यांची उपस्थितीत होती. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चंद्रशेखर नोमुलवार शिंपी समाज अध्यक्ष व ज्ञानेश्वजी गटलेवार, बाबु पोटपेलीवार, विलास कठाणे, दिनेश गाऊत्रे व इतरही ओ बी बारा बलुतेदार समाज बांधवाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Copyright ©