यवतमाळ सामाजिक

बोदडी ग्राम पंचायती मध्ये शांतता समितीची बैठक

———————————————
ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले मार्गदर्शन
———————————————
घाटंजी- तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन ला नुकतेच रुजू झालेले ठाणेदार विनोद चव्हाण यांनी प्रथमतः च बोदडी गावाला भेट देवून ग्राम पंचायत पदाधिकारी यांचे सह गावकऱ्यांना बोलावून स्थानिक ग्राम पंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक घेतली.
गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणाच्याही असलेल्या समस्या तथा पोलिसा प्रती असलेली भीती दूर करण्याचा दृष्टीकोन पुढे ठेवून सरळ गावातील सर्वसामान्यांपासून आम जनतेचे ठाणेदारासोबत थेट सवांद व्हावा पोलीस हा जनतेचा मित्र आहे. हा समज त्यांच्यात रुजावा यासाठी ही बैठक आयोजित होती. यावेळी गावातील महिला व पुरुषांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. सोबतच प्रत्येक नागरिकाने कायद्याचे पालन करावे अश्या सूचना केल्या. ठाणेदार विनोद चव्हाण हे रुजू झाल्यानंतर प्रथमच गावात आल्याने त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी ग्राम ग्रामपंचायतीच्या सरपंचा उषाताई आत्राम, उपसरपंचा नर्मदा रमेश जाधव, सदस्य प्रकाश मरापे, पोलीस पाटील अतुल सेवतकार, राम बाजपेयी, सुरेश उरकुडे, चेतन जाधव, अशोक पिंपळकार, नरेश अळसपुरे, मनोज पुसनाके, भास्कर नैताम, रामराव आत्राम, ओंकार कामडी, जैतुजी टेकाम, मनोज आडे, पवन जाधव, चंदन पवार, लखन बाबू बाजपेयी, रोशन कामडी, पुरुषोत्तम पेंदोर, आकाश गोहाडे, आकाश राठोड, निलेश जाधव यांचे सह गावातील दारूबंदी समितीच्या महिला व असंख्य नागरिक उपस्थित होते.

Copyright ©