यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा सर्कल आजही विकासापासून वंचित.

सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा सर्कल डोंगराळ व अतिदुर्गम परिसर म्हणून ओळखल्या जातो,आजही हा परिसर विकास कामांपासून कोसो दूर आहे, स्वातंत्र्यानंतर सुद्धा या परिसरातील गावांची बिकट अवस्था आहे,या परिसरातील गावांमध्ये आजही मोठ्या समस्यांनी डोके वर काढले आहे,या परिसरातील अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी मोठ-मोठी पदे भूषविले आहे आणि मोठ्या मोठ्या पदावर विराजमान ही झालेली आहेत,याच परिसराच्या भरोशावर अनेक राजकीय नेत्यांनी सामाजिक व आर्थिक वैभव कमावलेलं आहेत,मात्र त्याच नेत्यांनी या भागातील नागरिकांच्या समस्याकडे डोळेझाक केली आहे,मागील अनेक दिवसापासून सावळी सदोबा परिसरातील अनेक गावे मूलभूत सुविधा पासून अजूनही वंचित आहे,या परिसरामध्ये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून, सावळी परिसरातील नागरिकांना रस्त्याने पायदळ चालणे
सुद्धा अवघड झाले आहे,या परिसरातील नागरिकांच्या आरोग्य बाबत आजही अनेक समस्या आहेत, अनेक गावातील आरोग्य केंद्रामध्ये,अनेक पदे रिक्त आहेत,पदभारावर अनेक प्राथमिक उपकेंद्राचा काम चालताना दिसतोय,अनेक वर्षापासून उन्हाळ्यामध्ये सावळी परिसरातील बहुतांश गावांना पाणीटंचाई सरख्या भीषण संकटाचा सामना करावा लागतो,शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च होऊन सुद्धा पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी मात कधी होणार असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडतोय? सावळी परिसरामध्ये विद्युत समस्या तर बाराही महिने कायम असते,त्यामुळे या परिसरातील लोकांना अंधारात राहण्याची सवयच झालेली आहे,विद्युत असून नसून काहीच फायदा नाहीत,प्रशासन आणि या परिसरातील राजकीय नेत्यांना कधी जाग येणार,परिसरातील समस्येकडे राजकीय पुढारी कधी लक्ष देणार,फक्त निवडणुका आल्या की मतदानासाठी यांच्या झोपी उघडतात का?या परिसरातील नागरिकांच्या समस्या विषयी या राजकीय नेत्यांना काही देणेघेणे नाहीत.

Copyright ©