यवतमाळ सामाजिक

महापारेषण कंपनीमधील कंत्राटी कामगारानी व्यक्त केला आक्रोश.”

“कंत्राटी कामगाराना कमी केल्याच्या निषेधार्थ ” तांत्रिक अप्रेंटिस, कंत्राटी कामगार असोसिएशनचे आक्रोश निषेध आंदोलन संपन्न ”

महापारेषण कंपनीमध्ये मनुष्यबळ पुर्नरचना लागु होतांना कामगार कमी होणार नसल्याचे अनेक वेळा शासन व प्रशासनाने हमी देवुन सुध्दा अतिरीक्त कामगार या कारणावरून नागपुर व ईतर परिमंडळा मध्ये कंत्राटी कामगार कमी करण्यात येत असल्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा राज्यामध्ये तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा निवेदनाव्दारे महापारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, ऊर्जा मंत्री यांना देण्यात आल्याची माहीती तांत्रिक कंत्राटी कामगार असोसिएशन चे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी दिली आहे.

महापारेषण कंपनीमध्ये तांत्रिक तृतीय व चतुर्थ श्रेणीमध्ये कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. सदरहु कंत्राटी काम गार हा नियमित कामगारांच्या टक्केवारी नुसार कार्यरत आहे. मोठया जबाबदारीची कामे व्यवस्थीत व निष्ठेने पार पाडण्याचे काम सदर कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे करीत आहे. महापारेषण कार्यालयीन आदेशानुसार कंपनीमध्ये सुधारित मनुष्यबळ पुर्नरचना नुसार अंमलबजावणी करीत असतांना कोणताही कर्मचारी कमी होणार नाही त्यांची काळजी घेणे अपेक्षीत होते. परंतु मनुष्यबळ पुर्नरचना लागु होतांना मोठ्या प्रमाणात तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कामगारांची संख्या कमी होत आहे. नियमित कामगारांची संख्या कमी झाल्यामुळे कंत्राटी कामगारांचा रोजगार हिरावुन जावुन त्यांचे कुटुंब उध्दस्त होत आहे. सदरहु प्रकार हा निदनीय आहे. नागपुर व ईतर परिमंडळातील कंत्राटी कामगारांना कमी करण्याचे दिलेले आदेश त्वरीत मागे घ्यावे. अन्यथा दिलेल्या अन्यायकारक आदेशाविरुध्द संघटना या नंतर प्रकाश गंगा – मुंबई येथे तिव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा तांत्रिक ऑप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिशनचे राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी केली.
या आंदोलनामध्ये उपस्थिताना वि.क्षे.तां.का. यूनियन चे केंद्रीय अध्यक्ष रवि बारई यांनी मार्गदर्शन करताना कमी होत असलेला कंट्राती कामगार परत रुजू करून घेई पर्यंत संघटना स्वस्थ बसणार नाही असे आश्वस्त केले , तसेच माजी विश्वस्त कामगार कल्याण- रवी वैद्य, असोसिशनचे राज्य उपाध्यक्ष – प्रशांत ननोरे, वि.क्षे.तां.का. यूनियन चे झोन पदाधिकारी – न्यानेश्वर महंत, झोन संघटक – परमानंद बनगयां यांनी सुधा मार्गदर्शन केले , तसेच विदर्भ प्रसिद्ध प्रमुख कल्पक वाईकर नागपुर जिल्हा संपर्क प्रमुख – मनीष धारम, जिल्हा अध्यक्ष विक्की कावळे,अमोल ठाकरे, अंगद जरुडकर,निलेश कोडापे,प्रणय काळबांडे,प्रफुल्ल केणेकर,प्रफुल्ल निमजे,तुषार चाभांरे,सुरज राऊत तसेच शेकडो च्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.

Copyright ©