यवतमाळ सामाजिक

बेग परिवारा कडून वृध्दाश्रमातील वृध्दाना स्नेहभोजन आर्णी प्रतीनिधी- सय्यद अक्रम

 

आर्णी. .जेष्ठ पञकार स्व. मन्नान बेग यांच्या जन्मदिना निमित्ताने त्यांचा परिवारा कडून आर्णी दाभडी रोडवरील शहरालगतच्या मातोश्री सुशीलाबाई नागापुरे वृध्दाश्रमातील निराधाराना स्नेहभोजन व जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या.
जेष्ठ पञकार स्व. मन्नान बेग यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येथे त्यांच्या मुलांनी अभिवादन करण्यासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव, जेष्ट नागरीक मंडळाचे गजाननराव घोडेराव, बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठलराव देशमुख, पञकार संघाचे अध्यक्ष राजेश माहेश्वरी, श्रीकृष्ण जावळकर यांनी मनोगत व्यक्त करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी माजी आमदार ख्वाजा बेग, युनुस बेग, इम्रान बेग, रेहान बेग, फरान बेग, विलासराव वातिले, प्रा. निवृत्ती पिस्तुलकर, देवराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य अजाबराव बुटले, राजेश कुशवाह, शाम रणनवरे, प्रा. ललित नाफडे, प्रविन मंदुलवार, माधवराव राठोड, दिनेश जाधव, हरिओम बघेल, सचिन शिंदे, तकीद बेग अमीन भाटी , गणेश हिरोळे, रफीक तगाले, शंकर राऊत खुशाल नागपुरे अशपाक शेख आदी उपस्थित होते.

Copyright ©