यवतमाळ सामाजिक

गणपती बाप्पा च्या विसर्जनासाठी घाटंजी न. प. कडून टँक ची निर्मिती

घाटंजी- नुकतेच गणपती बाप्पा चे मोठ्या भक्ती भावाने आगमन झाले असून गणेश भक्तांनी प्रतिष्ठापना केली. बाप्पाच्या सर्व भक्तीभावाचे कार्यक्रम सोपस्कार आटोपून विसर्जन केल्या जाते. यामध्ये कोरोना काळाचा विचार करून व नदी सवर्धनाचा मानस पुढे करून घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या संकल्पनेतून घाटंजी शहरातच नगर परिषदे कडून गणपती बाप्पाचे विसर्जन टँक बनविले आहे.
नदीला असलेला प्रवाह, कोरोना काळ, नदी सवर्धन अनेक बाबी पुढे करून घाटंजी नगर परिषदेने गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी घाटंजीत विसर्जन टँक ची निर्मिती केली आहे. यात घाटंजी शहरातील समस्त गणेश भक्तांना बाप्पाचे विसर्जन व कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करणे सोपे होईल. तरी शहरातील नागरिकांनी या टँक मध्येच गणपती बाप्पाचे विसर्जन करून नदी सवर्धनाच्या कामात सहभागी व्हावे असे मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी कळविले आहे.

Copyright ©