यवतमाळ सामाजिक

किन्ही लघु प्रकल्प खालील जनतेला सतर्कतेचा इशारा

किन्ही लघु प्रकल्पात १००% जलसाठा

पारवा पो. स्टे. नी दिला सतर्कतेचा इशारा
———————————————-
घाटंजी- तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या किन्ही लघु प्रकल्पात जलपातळी २४८ मीटर पैकी उपयुक्त साठा १.४० दशलक्ष घनमीटर क्षमतेचा प्रकल्प हा १००% भरला असल्याने या प्रकल्पाच्या पाणी विसर्ग मार्गावरील जनतेला पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांचे कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे.
किन्ही लघु प्रकल्पाच्या क्षमते एवढा जलसाठा या प्रकल्पात झाला आहे. आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी पाऊस पडणार असल्याचे वर्तविले आहे त्यामुळे पाऊस झाल्यास या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी चिंचोली- सोनखास -वाघाडी नाल्यामधून वाघाडी नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती घाटंजी शाखा अधिकारी पाटबंधारे शाखा यांनी पारवा पोलीस स्टेशन ला कळविले आहे.
त्यामुळे या भागातील व नदीकाठचे रहिवासी लोकांना याबाबतची कल्पना असावी. कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी सतर्कता बाळगावी याकरिता ठाणेदार विनोद चव्हाण यांनी दखल घेऊन जनतेनी संभाव्य अशी वेळ आल्यास सुरक्षित स्थळी स्थानांतरण होणे, दक्षता बाळगणे अशा सूचना केल्या आहेत. यादरम्यान काही आपत्ती उदभवल्यास संभाव्य धोका निर्माण झाल्यास अश्या अडचणीत मदतीकरिता यवतमाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र, जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष यांच्या दूरध्वनी क्रमांक ०७२३२- २५६७०० तसेच पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांचे मोबाईल नंबर८३२९८९९५६५ वर संपर्क करून आपली हानी टाळावी व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार विनोद चव्हाण यांनी केले आहे. सदरच्या आपत्ती मध्ये काही समस्या ओढावू नयेत नागरिकांना आपत्ती काळात मदतकार्य करता यावे या करिता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पांढरकवडा उप विभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पारवा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनचे समस्या सोडविण्या करिता आपत्ती व्यवस्थापन करण्यात आल्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Copyright ©