यवतमाळ सामाजिक

आधुनिक तंत्रज्ञान क्यूआर कोडच्या साहाय्याने गोदावरी अर्बन सुलभ सेवा देण्यास सज्ज – खासदार हेमंत पाटील

 

नांदेड : काळानुरूप बदलत असलेली आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली गोदावरी अर्बन वेळोवेळी आत्मसात करून आपल्या, ग्राहक सभासद , ठेवीदारांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सदैव सज्ज असते या तंत्रज्ञानाच्या जोरावरच गोदावरी अर्बनची आजवर यशस्वी वाटचाल सुरू असून पुढेही अशीच राहील असे गौरवोद्गार गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष, खासदार हेमंत पाटील यांनी काढले गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते गोदावरी अर्बनच्या क्यूआर कोड प्रणाली,कॅश डिलिव्हरी व्हॅन चे लोकार्पण करण्यात आले.क्यूआर कोड प्रणालीमुळे भारतातील कुठल्याही सेक्टरमध्ये केवळ एका क्लिकवर कॅशलेस व्यवहार करणे सर्व ग्राहकांसाठी सोयीचे होणार आहे.

गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमाला व्यासपीठावर खासदार हेमंत पाटील यांच्यासह आ.राजश्री पाटील, श्रीराम पाटील,कमलताई पाटील, आ.बालाजी कल्याणकर, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, सचिव रविंद्र रगटे, संचालक साहेबराव मामीलवाड, प्रा.सुरेश कटकमवार, प्रसाद महल्ले, मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे, सदाशिव पुंड, रुद्र हेमंत पाटील, नेटविन समूहाचे मसूद अन्वर, ऋषिकेश कोंढेकर, जीवन किसान अग्रोचे धीरज मानकरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाच्या सुविधा देण्यासाठी जीवन किसान अग्रो सोबत करार करण्यात आला.

यावेळी बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, अत्यंत कमी कालावधी मध्ये गोदावरी अर्बनने यशाचे शिखर गाठले आहे. सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून काळानुरूप बदलत गेलेल्या तंत्रज्ञानासोबत स्वतःमध्ये बदल करून कार्याला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे त्यामुळेच गोदावरीची यशस्वी वाटचाल सुरू असून पुढेही हीच घौडदौड कायम राहील यात दुमत नाही.चलनविरहित अर्थव्यवहार सुरळीत व्हावेत याकरिता कार्य करून उत्तम सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी नुकतेच सलग पाचव्यांदा मिळालेला बँको पुरस्काराबद्दल सर्व गोदावरी अर्बनच्या समूहाचे खासदार हेमंत पाटील यांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी केले. नेट बँकिंग,एनइएफटी -आरटी जीएस,युपीआय, मोबाईल बँकिंग, एटीम सुविधा आणि आता नव्याने सुरू करण्यात आलेली क्यूआर कोड प्रणाली व कॅश डिलिव्हरी वॅन या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहक, ठेवीदार यांना उत्तमतोम दर्जेदार सुविधा देऊन कामकाजात सुसूत्रता आणणार आहोत असे धनंजय तांबेकर यांनी स्पष्ट केले.आमदार बालाजी कल्याणकर यांनी सुद्धा राजश्री पाटील यांच्या कार्याबद्दल गौरव करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सर्वांनी दिलेल्या शुभेच्छारूपी आशीर्वादाना उत्तर देताना गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील म्हणल्या की, आमच्या गोदावरी अर्बनच्या कामाबद्दल असलेली पवित्र निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न हेच आमच्या यशाचे गमक आहे. आजवर आमच्या ग्राहक ,ठेवीदार, यांनी दाखवलेला सार्थ विश्वास यातूनच आम्हांला नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आत्मसात करून त्या सुविधा सर्वांपर्यन्त पोहचविता आल्या आहेत.यापुढेही आम्ही अश्याच आधुनिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहू असेही राजश्री पाटील म्हणल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोदावरी अर्बनच्या वतीने सत्कारमूर्ती राजश्री पाटील यांना माहेरची साडी देऊन सन्मान करण्यात आला. यवतमाळ शाखा ३०० कोटी ठेवींचे उद्धिष्टपूर्ती प्रित्यर्थ वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे यांचा खासदार हेमंत पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गोदावरी अर्बन आणि समूहातील सर्व अधिकारी, कर्मचारी, आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©