Breaking News यवतमाळ सामाजिक

यवतमाळ तालुक्यात घडली नात्याला काळीमा फासणारी घटना

भाचीचे मामासोबत असलेले प्रेम प्रकरण बेतले भावजयिवर

———————————————-
बदनामी पासून परिवाराला वाचविताना करावी लागली विवाहितेला आत्महत्या
———————————————-
सासरच्या जाचाला कंटाळून केली विवाहितेने आत्महत्या
———————————————-
यवतमाळ- तालुक्यातील ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चांदापुर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडवीत चक्क पतीपासून विभक्त राहत माहेरच्या गावात राहून चक्क नणंदेणे मामासोबत प्रेम प्रकरण घडविले या बदनामी पासून वाचविणारी भावजिय सारिका शिवदास राठोड हीलाच पती, सासरा व नणंद यांचे कडून मारझोड करून आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्याचा समाजमन सुन्न करणारा प्रकार घडला.
सविस्तर वृत्त असे की, सारिका शिवदास राठोड वय २८ वर्ष हीचा विवाह समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे २०१२ मध्ये चांदापूर येथिल शिवदास सकलाल राठोड वय ३५ वर्ष यांचे सोबत झाले होते लग्नानंतर काही वर्ष त्यांचा संसार सुरळीत चालला यात त्यांना मनोज व रंजीत असे दोन पुत्र रत्न जन्माला आले. मात्र अश्यातच विवाहित असलेली नणंद शुशीला जाधव आपल्या नवऱ्याला दूर करून विभक्त राहण्याच्या दृष्टीने एका मुलीला घेवून माहेरी आली. आणि सारिकाच्या घराशेजारी वास्तव्यास राहू लागली. यामध्ये नात्याने मामा असलेले गणेश सोमला जाधव यांचे सोबत प्रेम सबंध जुळले तो सारखा शुशीला वास्त्यव्यास राहत होती तिथे सारखा ये जा करून अश्लील चाळे करू लागला. ही समाजमन सुन्न करणारी घटना हवे सारखी गावात पसरली होती. यात आपल्या परिवाराची बदनामी होत आहे. समाज आपल्यावरही नाव बोट ठेवतील, आपल्या मुलावर वाईट परिणाम होईल या उद्देशाने सारिका ने आपल्या पतीला समजवीन्याचा प्रयत्न करून नात्याला काळीमा फासणारी घटना विचारात घेऊन याला पायबंद घालण्यासाठी विनंती करीत होती. मात्र तिचा पती तिचे काहीएक न ऐकता बहिणीचीच बाजू घेवून तिला मारहाण करीत होता. अखेर तिने पित्या समान असलेले सासरे सकलाल राठोड यांना ही बाब सांगितली असता झाले उलटेच सासऱ्याने उग्र रूप धारण करून थापडा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तिचा पती शिवदास हा शेतात गेला होता. झालेल्या मारहानी बद्दल ती आपल्या पतीस सांगायला शेतात गेली तिच्या पाठोपाठ तिची नणंद ही गेली तर ही गोष्ट आपल्या पतीला सांगताच पतीने व नणंदेने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. अखेर वैतागलेल्या सारिकाने सासरच्या जाचाला कंटाळून विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही बाब सारिकाच्या माहेरच्याना माहीत होताच तिच्या वडिला सोबत तिचे चुलत भाऊ सुधाकर गणपत चव्हाण वय ३० वर्ष रा. चांदापूर यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन गाठून घडलेला प्रकार कथन करून फिर्याद नोंदविली त्यावरून पती शिवदास सकलाल राठोड, सासरे सकलाल राठोड, नणंद शुशीला जाधव, व ज्या कारणामुळे सारिकाने आत्महत्या केली ते प्रेमवीर समाजाला काळीमा फासणारे मामा गणेश सोमला जाधव सर्व राहणार चांदापुर यांचेवर भा. द.वी. कलम ४९८, ए,३२३ ,३०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहे. अखेर परिवाराची बदनामी थांबवू इच्छिणाऱ्या व मामा भासी चे पवित्र नाते काय असते यासाठी धडपणाऱ्या सारीकालाच आत्महत्या करण्याची वेळ आल्याने तिचे निरागस दोन रत्न उघड्यावर पडले आहे. त्यामुळे चांदापूर गावासह परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Copyright ©