यवतमाळ राजकीय

जीवन प्राधिकरणाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मनसेचे जलसमाधी आंदोलन

हाडके कंपनी, भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सदर कंपनीला काळया यादीत समाविष्ट करा

यवतमाळ शहरात अमृत योजनेच्या नावाखाली संपूर्ण शहरभर ठिकाणी गेल्या वर्षभरापासून वीस ते तीस फुटाचे खड्डे अमृत योजनेच्या ठेकेदाराने करून ठेवले असून रोज या खड्ड्यांमध्ये छोटे-मोठे अपघात घडत आहे. आतापर्यंत चार ते पाच लोकांचा बळी या खड्ड्यांनी घेतला आहे तसेच अनेक छोटे-मोठे अपघात रोजच घडत आहेत. जीवन प्राधिकरणाचे सदर काम करणाऱ्या कंपनीवर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नसून संबंधित कंपनी व ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे या अनुषंगाने स्थानिक चर्च रोड येथे जीवन प्राधिकरणाच्या हाडके कंपनी ने पाण्याचं टेस्टिंग घेण्यासाठी वीस फुटाचा एक खड्डा करण्यात आला आहे या खड्ड्यात आठ ते दहा फूट पाणी असून नुकतच एका अज्ञात व्यक्तीचा या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे . पाच दिवस होऊनही पोलीस प्रशासन व जीवन प्राधिकरणाने संबंधित कंपनी ठेकेदार व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळ च्या वतीने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात चर्च रोड वरील जीवन प्राधिकरणाच्या त्याच खड्ड्यात भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिनांक 11 रोजी सकाळी 10 वाजता देण्यात आला आहे .जोपर्यंत संबंधित कंपनी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही होत नाही आणि सदर हलगर्जीपणा करणाऱ्या भ्रष्ट कंपनी कंपनीला काळया यादीत समाविष्ट करत नाही तोपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे . या आंदोलनात प्रामुख्याने मनसेच्या जिल्हा नेत्यांसमवेत जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल साजिद विकास विकास पवार शहराध्यक्ष एडवोकेट अमित बदनोरे यासह शहरातील मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. मनसेच्या माध्यमातून यवतमाळकर जनतेला जीवन प्राधिकरण याविरोधात या लढ्यात समाविष्ट होण्याचे आवाहन मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Copyright ©