Breaking News सामाजिक

युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेत अनेक युवकांचा प्रवेश

युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील टागोर चौक येथील युवासेनेच्या कार्यालयांमध्ये झरी, मारेगाव, वणी येथील अनेक युवकांनी जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून युवा सेनेमध्ये प्रवेश केला. युवासेना जिल्हाप्रमुख प्रमुख विक्रांत चचडा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी युवासेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपला हक्क बजावला, तसेच शहरातील गोरगरीब जनतेला अन्नदान वाटप करण्यात आले. विक्रांत चचडा यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहून,संपूर्ण युवासेनेमध्ये स्फूर्ती निर्माण झाल्याचे एकंदरीत चित्र दिसून आले. यावेळी हजारो युवकांचा युवासेनेत प्रवेश पाहता, शिवसेना व युवासेना मोठ्या जोमाने कामाला लागली .असे संपूर्ण विधानसभा क्षेत्रामधुन म्हणून बोलले जात आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे , मीनल गौरकार ताई,तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगुल, महिला उपजिल्हाप्रमुख डिमनताई टोंगे, गणपत लेडांगे, महेश चौधरी, अजय चन्ने ,तालुका प्रमुख संजय आवारी ,संतोष माहुरे, संदीप वीचु, जिवन डवरे, राजू खामनकर, प्रसाद ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन, युवासेनेचे शहर संघटक कुणाल लोणारे उपशहर प्रमुख सौरभ खडसे, तालुका समन्वयक अनुप चटप,निलेश बेलेकर, मयूर ठाकरे कुंदन टोंगे, हिमांशू बत्रा, बंटी येरणे, श्रीकांत सांबजवार, राहुल राजूरकर, बंटी सहानी, निलेश चिंचोळकर, प्रवीण वरारकर, दानिश खान, चेतन बरशेट्टीवार व समस्त युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Copyright ©