Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; एक कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2165 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 10 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर एक जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सात तर बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण आठ आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 970 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 970 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72864 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71069 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 30 हजार 557 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 57 हजार 495 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.97 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.00 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2165 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2165 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 781 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
______________________________________

नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना पिक विमा कंपनीस द्या
कृषी विभागाचे आवाहन

यवतमाळ दि.10, जिल्ह्यात काही निवडक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान होत आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास त्या अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत विमा संरक्षित क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. तर त्या बाबतीमध्ये सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले याबाबतची सूचना आपल्या संबंधित विमा कंपनी यांना देण्याकरता पुढील पर्यायांचा वापर करता येईल.
क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय , कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय आणि ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा.
याद्वारे नुकसानीबाबतची पूर्वसूचना दिल्यानंतर वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.
तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन आपल्या विमा काढलेल्या पिकांच्या नुकसानीबाबत संबंधित विमा कंपनीला पूर्वसूचना देण्याबाबत कृषी विभागामार्फत अवाहन करण्यात येत आहे.

Copyright ©