यवतमाळ सामाजिक

घाटंजी तहसील कार्यालयात ‘मिशन वात्सल्य’ बैठक संपन्न.

घाटंजी तालुक्याची मिशन वात्सल्य समितीची बैठक अध्यक्ष तथा तहसीलदार पूजा माटोडे यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात दि. ९ रोजी बैठक पार पडली . कोरोना मुळे एकल ( विधवा ) झालेल्या महिला व त्यांच्या बालकांच्या योजना प्राधान्याने राबविणेचे आदेश तहसीलदार पूजा माटोडे यांनी बैठकीत दिले .

बैठकीस बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा समिती सचिव नवनाथ वामन बैठकीचे विषय व प्रास्ताविक करण्यात आले या बैठकीला उपस्थित पंचायत समितीच्या गटविकास आधिकारी सोनाली माडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पंजाब रणमले एस. एम. होटे संजय गांधी नायब तहसीलदार,तालुका आरोग्य अधिकारी प्रतिनिधी शीला लोणारे गटशिक्षणाधिकारी दिपाली गुल्हाणे ,तालुका कृषि अधिकारी प्रतिनिधी प्रफुल्ल अक्कलवार,स्वयंसेवी संस्था
विकासगंगा संस्था रणजित बोबडे अरुण कांबळे जिल्हा बाल संरक्षण चे संरक्षण अधिकारी माधुरी पावडे स्थापता अभियंता राहुल दहापुते, कु वाय एन वाघ पुरवठा निरीक्षक पोलीस विभागाचे जामदार राहुल खंडागळे मोहन बागेश्वर नितीन कडू उपस्थित होते.

कोविड -१९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल (विधवा) झालेल्या महिलांना शासकीय योजनांच्या लाभ मिळवण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य योजनेची अंमलबजावणी करण्यास तालुका स्तरीय समन्वय समिती स्थापना करण्यात आली व कर्तव्य जबाबदारी यावर समिती सचिव नवनाथ वामन यांनी माहिती सादर केली
कुटुंबनिवृत्त वेतन योजना, शिधा पत्रिका, वारसा प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य लाभ योजना, अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व फी, घरकुल, कौशल्य विकास अंत्योदय योजना, आदीवासी विकास विभागाचा व कृषी विभागाच्या उमेद अभियानातील वैयक्तिक लाभाच्या योजना लाभ मिळवून देणे.मुलांसाठी बाल संगोपन योजना , दारिद्रय रेषेखाली असणा-या महिलेस राष्ट्रिय कुटुंब लाभ योजना शैक्षणिक अडचणी सोडविणे , मय्यत पतीच्या नावावरील घर , जमिन यांची वारस नोंद तातडीने करणे , विभक्त किंवा नविन शिधापत्रिका वर रेशनचे धान्य , गावपातळीवर असणा-या विविध योजनेत प्राधान्य देणे , उद्योग – व्यवसाय सुरु करणेसाठी प्रशिक्षण कर्ज प्रकरणे ग्रामस्तरीत स्तरीय पथक मध्ये तलाठी ग्रामसेवक शिक्षक अंगणवाडी सेविका तसेच शहरी क्षेत्रात वार्ड निहाय पथके गावात व शहरातील एकल (विधवा) महिला अनाथ बालकांच्या कुटूंबियांना भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती देतील तसेच विविध योजनांचा लाभ तो प्रस्ताव तालुका स्तरीय समन्वय समितींकडे सादर करतील
तसेच महसुल विभाग , कृषिविभाग , महिला बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग , आदिवासी विभाग समाजकल्याण, उमेद अभियान पंचायत विभाग पशुसंवर्धन विभाग नगर पालिका सारख्या विविध विभागाच्या सर्व योजनां समन्वय साधून लाभ देण्याबाबत चर्चा करण्यात आली

Copyright ©