Breaking News यवतमाळ राजकीय सामाजिक

*यवतमाळ तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मनमानी कारभाराने गाठला कळस* 

*यवतमाळ तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मनमानी कारभाराने गाठला कळस*

———————————————

*जि. प. सदस्याच्या सूचनेला अशोभनीय उत्तर*

———————————————

यवतमाळ- सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात राजकिय मर्जी जोपासून मर्जीतील कर्मचाऱ्यांना सेवेत सुट व प्रामाणिक कर्मचाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मनमानी कारभाराने जास्त नियम बाह्य सेवा करण्यास भाग पाडणे त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्राम पंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांनी माजी जि. प. उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्यामभाऊ जयस्वाल यांच्या दालनात प्रकरण पोहचविले. याची दखल घेत त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती सुशीला खोडवे यांना दूरध्वनी वरून संपर्क साधला असता एका जबाबदार पदाधिकारी यांचे सोबतच उद्धट बोलून हिवरी येथिल आरोग्य केंद्राच बंद करा असे बेताल व्यक्तव्य केल्याचे पुढे आले आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात राजकिय लोकांचे मर्जी नुसार कारोभार चालत असल्याने येथे प्रामाणिक कर्मचाऱ्यांना कोणतीही खंड न ठेवता सेवा बजावावे लागते तर ज्या कर्मचाऱ्यांचे राजकीय वाली आहे अश्या कर्मचाऱ्यांना अकरा दिवसातून एक दिवस सेवा हा मनमानी कारभार या ठिकाणी चालू असल्याचे पाहून ग्राम पंचायत सदस्य व गावकऱ्यांनी सबंधित तालुका अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कडे जाण्याचा बेजाबदार सल्ला दिला. त्यावरून लोकप्रतिनिधी या नात्याने माजी जि.प. उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य श्यामभाऊ जयस्वाल यांचे कडे हिवरी आरोग्य केंद्रातील खंडित झालेली आरोग्य सेवा व येथिल मनमानी कारभार याचा पाढा वाचून न्यायाची मागणी करून आरोग्य सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. यावरून त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना दूरध्वनी करून संपर्क केला असता त्यांना सुध्दा अपेक्षित उत्तर न देता तेथील आरोग्य केंद्राच बंद करण्याचा अशोभनीय उद्धट उत्तर दिले. यावरून चिडलेले जयस्वाल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तातडीने एक निवेदन देवून या उद्धट तालुका आरोग्य अधिकारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जेव्हा जी.प.तील जबाबदार पदाधिकारी यांचे सोबतच हे अधिकारी असे वागत असेल तर सर्वसामान्य जनतेस काय वागणूक मिळत असेल याची कल्पना करणेच योग्य ठरणार नाही. यावरून असे सिद्ध होते की, या अधिकाऱ्याला चांगलेच राजकीय पाठबळ असावे यात ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्याशिवाय प्रामाणिक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी साहेबांनी या तालुका आरोग्य अधिकारी यांची मनमानी कारभाराचे तातडीने दखल घ्यावी अन्यथा हिवरी येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्राम पंचायत पदाधिकारी आणि गावातील नागरिकांनी दिला आहे.

Copyright ©