यवतमाळ सामाजिक

ऑनलाईन तान्हा पोळा स्पर्धेचे आयोजन

कोविड 19 च्या समुह संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पोळा सन साजरा करण्यावर निर्बंध लादले आहेत. मात्र तान्हा पोळा साजरा करण्यासाठी चिमुकल्यांच्या आनंदावर विरजन पडू नये यासाठी माजी सभापती नितीन गिरी मित्र परिवाराच्या वतीने ऑनलाईन तान्हा पोळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या कोरोनामुळे संभाव्य गर्दीची शक्यता लक्षात घेता अनेक उत्सवांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सन उत्सव घरातच साजरे करावे लागत आहेत. त्यातच पोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सन आहे. मुलांमध्ये भारतीय संस्कृतीचे विचार रूजण्यासाठी तान्हा पोळा ऊत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या संकटामुळे सामुहिकरीत्या ऊत्सव साजरे करण्यावर बंदी आहे. लहान मुलांचा तान्हया पोळ्याचा उत्साह कमी होऊ नये यासाठी नितीन गिरी मित्र परिवाराच्या वतीने ऑनलाईन तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बैलाची आकर्षक सजावट करण्याऱ्या बालकांना प्रथम पुरस्कार म्हणून 1000 रुपये, व्दितीय पुरस्कार 700 रुपये व तृतीय पुरस्कार 500 रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त प्रोत्साहनपर बक्षीस सुध्दा देण्यात येणार आहे. त्यासाठी बालकांनी आकर्षक सजावट केलेल्या बैलांचे छायाचित्र व्हाॅटसअप क्रमांकावर पाठवावे असे आवाहन नगरसेवक नितीन गिरी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

Copyright ©