Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही ; चार कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2160 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 06 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले नाही तर चार जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात नऊ तर बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण 10 आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 208 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणपाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 208 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72864 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71067 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आर्णी येथील एका पुरूष रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 27 हजार 171 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 54 हजार 299 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.02 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.00 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2160 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 14 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2160 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 776 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

 

लोकशाही दिनात 71 तक्रारी प्राप्त

यवतमाळ दि. 06 सप्टेंबर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज दोन स्विकृत व 69 अस्विकृत असे एकूण 71 तक्रार अर्ज प्राप्त झाले. या प्रकरणांवर आणि एकूणच लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिल्या.

प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तसेच इतर सर्व विभाग प्रमुख/अधिकारी बैठकीस हजर होते.

लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला असता ज्या विभागाकडे लोकशाही दिनातील प्रकरणे प्रदिर्घ कालावधी पासुन प्रलंबीत आहेत, ती प्रकरणे सात दिवसाच्या आत निकाली काढण्याचे तसेच एक महिण्यापेक्षा जास्त काळ कोणतीही स्विकृत व अस्विकृत तक्रार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे त्यांनी विभागप्रमुखांना सांगितले.

लोकशाही दिनाला सर्व विभागाचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©