यवतमाळ सामाजिक

सामाजिक उपक्रमांनी साजरा केला वाढदिवस..!

———————————————
निखिल देठे ठरतोय प्रेरणादायी
———————————————
घाटंजी- सध्याच्या काळात जन्मदिवस साजरा करणे म्हणजे आपला परिवार आप्तेष्ट मित्रमंडळी यांच्या समवेत मौज मजा करून गावाच्या मुख्य भागात शुभेच्छा फलक झळकावून अमाप पैसा खर्च केल्या जात असल्याचे पहावयास मिळते. मात्र सतत गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा देणारे छत्रपती महोत्सवचे संयोजक निखिल राजेंद्र देठे यांनी २ सप्टेंबर रोजी सामाजिक दायित्व अंगिकारून आगळ्या वेगळ्या उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा केला.
सामाजिक बांधिलकी जोपासत सदैव जन सेवा अंगिकारून तरुण पिढीच्या मनात वास करणारे निखिल देठे यांनी छत्रपती महोत्सव समितीची फार मोठी फळी निर्माण करून त्यांच्या माध्यमातून नेहमी समाज कार्यात तत्पर असतात. त्याच पद्धतीने व्यर्थ खर्च करून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा त्यांनी कोरोना आजार याच सोबत घाटंजी शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन याला आळा घालण्यासाठी मच्छरांचा प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून फाग मशिनद्वारे जंतुनाशकाची सलग दोन दिवस फवारणी करण्यात आली. याच सोबत शहरातील खुल्या जागेवर नैसर्गिक वाढलेले गवत, झाडेझुडुप यामुळे होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन त्याला नष्ट करण्यासाठी तणनाशक फवारणी करण्यात आली. कोरोना काळात सुरुवातीपासून जीवाचे रान करून रुग्णाची देखभाल करून आता लसीकरण कार्य करण्यासाठी झटणारे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी भगत, रविंद्र खांडरे, नितीन ढवळे, चेतन मोडक यांचे सह परिचारिकांचा कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येवून त्यांचे मनोबल वाढविले. त्याचक्षणी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील सॅनिटरी पॅड चा तुटवडा पाहून रुग्णालयाला सॅनिटरी पॅड देण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात येवून वाढदिवस साजरा केला. निखिल देठे यांच्या या वाढदिवसाच्या उपक्रमाने त्यांचेवर स्तुती सुमनाचा वर्षाव होत आहे.
या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व उपक्रमाचे आयोजन वैभव मलकापूरे, महेश ठाकरे, हर्षल भोयर, कुणाल राऊत, नवनीत ढोणे, चेतन ताजने, सचिन फुसे, करण पंधरे, विनय साठे, सोज्वल धोटे व छत्रपती महोत्सव समितीच्या सदस्यांनी करून हा उपक्रम यशस्वी केला.

Copyright ©