यवतमाळ सामाजिक

घाटंजी तालूक्यात निवासी उपजिल्हाधिकारी यांचे शेतकरी यांना ई-पीक पाहणीबाबत‌ मार्गदर्शन

घाटंजी- महाराष्ट्र शासनातर्फे शेतकरी यांच्या ७/१२ वरील पीकांच्या नोंदी अचुक व पारदर्शक व्हाव्यात याकरीता ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे “माझी शेती माझा सातबारा, मीच लिहिले माझा पीक पेरा” या नुसार शेतकरी आपला पीकपेरा स्वत: लिहीनार आहे.याकरीता घाटंजी तालूक्यातील टिटवी व साखरा येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री ललीतकुमार व-हाडे यांनी प्रत्यक्ष भेट‌ देवून शेतकरी यांना मार्गदर्शन केले.

ई – पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत संपुर्ण राज्यात शेतकरी यांना शासनाकडून मिळना-या योजना,अनूदान तसेच सात बारा वरील पिकांच्या नोंदीमुळे मिळनारे लाभ हे वेळेत मिळण्यासाठी त्यांचा पिकपेरा अचूक असणे आवश्यक असल्याने व तलाठी यांना वेळेत पीकांच्या नोंदी सात बारा वर घेता याव्यात याकरीता ई-पिक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे याकरीता तालूक्यात ग्राम स्थरावर मंडळ अधिकारी, तलाठी,पोलीस पाटील,कोतवाल,सरपंच,रोजगार सेवक संगणक ऑपरेटर,सेतू चालक इ. ग्राम स्थरावरी सर्व यंत्रणा मार्गदर्शन करीत आहेत.तसेच तालूक्यातील शेतकरी यांना ई-पीक पाहणी बाबत मार्गदर्शन करण्याकरीता तहसिलदार,नायब तहसिलदार हे स्वत: तालूक्यात शेतकरी यांच्या शेतात प्रत्येक्ष जावून ई-पीक पाहणी अंतर्गत शेतकरी यांनी ॲपद्वारा पीकांची नोंदणी करण्याकरीता मार्गदर्शन करीत आहेत.निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतात‌जावून शेतकरी यांनी स्वत: आपल्या शेतातील लागवड केलेल्या पिकांच्या अचूक नोंदी आपल्या सात-बारा वर व्हाव्यात याकरीता मोबाईल ॲपद्वारा नोंदणी करण्याकरीता मार्गदर्शन केले तसेच तालूक्यातील सर्व ग्रामस्थरावरील सर्व अधिकारी/कर्मचारी/पदाधिकारी यांनी शेतकरी यांना मार्गदर्शन करून पीकपेरा नोंदी करण्याकरीता मदत करण्याच्या सुचना दिल्यात तसेच तालूक्यातील सर्व शेतकरी यांनी लवकरात लवकर आपल्या शेतातील पीकांची नोंद ई-पीक पाहणी ॲपद्वारा करण्याचे आवाहन देखिल‌ करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्रीमती पुजा माटोडे, नायब तहसीलदार श्रीमती माला गेडाम,मंडळ अधिकारी श्री.फुलमाळी,मंडळ अधिकारी श्री, येरकर तलाठी श्री.नदीम, तलाठी श्री. किनाके यांचेसह ग्राम स्थरावरील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते…

Copyright ©