यवतमाळ सामाजिक

नांझा येथे महात्मा गांधी सालोड वर्धा यांच्या वतीने रोगनिदान शिबिराचे आयोजन

 

कळंब तालुक्यातील नांझा येथे महात्मा गांधी रूग्णालयात सालोड वर्धा तर्फे रोगनिदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन डॉ कोल्हे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच रेखा हसतबांधे प्रमुख अथिति म्हणून वंदना नानोटे पर्यवेक्षक कळंब विनोद शेळके उपसरपंच देव कुमार गोंडाणे ग्रामसेवक डॉ सत्यम सुपारे डॉ शामली हिवरे महात्मा गांधी रूग्णाल सालोड हे उपस्थित होते पोषण आहार दिनानिमित्त सौ वंदना नानोटे यांनी मार्गदर्शन केले व प्रतिज्ञा वाचन केले आरोग्य सेवेत विकास मंचचे कार्य अभिनंदनीय आहे असे मनोगत सरपंच यांनी व्यक्त केले कोरोना काळात प्रशसनिय कामगिरी करणाऱ्या आशा सेविका कविता शिवणकर यांना शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले संचलन दिनेश हसतबांधे प्रास्ताविक अशोक उमरतकर तर आभार सौ प्रमिला लोणकर यांनी मानले शिबिरात १२५ रूग्णांची तपासणी करण्यात आली शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य शंकर मेश्राम सौ रूपाली मेश्राम दिलीप मलांडे उपसरपंच यांची उपस्थित होती दिनेश हसतबांधे राजेश भोयर फ्रपूल डंभारे प्रशांत मडावी महेश केराम सौ प्रमिला लोणकर सौ कविता शिवणकर यांनी सहकार्य केले

Copyright ©