Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; तीन कोरोनामुक्त

 

जीएमसी, डीसीएचसीखाजगी रुग्णालयात 2150 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 04 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर तीन जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 17 आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1713 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 1711 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72863 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71059 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये यवतमाळ येथील दोन रुग्णांचा समावेश असुन त्यात एक महिला व एक पुरुष आहे.
जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 25 हजार 956 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 53 हजार 31 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.04 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.12 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2150 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 24 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2150 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 21 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 766 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 752 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.
000

*जिल्ह्यातील 7093 विद्यार्थ्यांनी दिली एम.पी.एस.सी.ची परीक्षा*

यवतमाळ दि. 4 सप्टेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आज महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 घेण्यात आली. या परिक्षेसाठी यवतमाळ शहरातील 43 व दारव्हा शहरातील 5 असे जिल्ह्यातील एकूण 48 परिक्षा केंद्रावर परिक्षेचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षेला जिल्ह्यातील दहा हजार 539 परीक्षार्थिंची नोंदणी करण्यात आली होती, त्यापैकी सात हजार 93 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर तीन हजार 440 परीक्षार्थी गैरहजर होते. परीक्षेसाठी हजर असलेल्या परीक्षार्थींची टक्केवारी 67.30 होती. परीक्षा शांततेत पार पडली असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Copyright ©